मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय प्रलंबित आहे. हे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्रिपदासाठी महिनाभर वाट पहावी लागणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले यांचे नाव चर्चेत असल्याचेही समोर आले. यावर भरत गोगावले यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘‘शिवसेनेकडेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राहणार आहे, म्हणूनच एवढे दिवस सगळ्या घडामोडी सुरू आहेत.’’ असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त रायगडावर आले होते.
त्यावेळेस याबाबत त्यांच्याशी काही बोलणे झाले का? असे विचारले असताना ते म्हणाले की, ९ जूनला तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा रायगडावर होणार आहे. त्याचे मी निमंत्रण दिले आहे. पालकमंत्रिपदाबाबत आमची कोणतीही चर्चा झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.