जळकोट : प्रतिनिधी
अनेक गावात शासनाने पाझर तलाव व साठवण तलावे निर्माण केले परंतु याकडे लक्ष देण्यास शासनाला वेळ नसल्याचे दिसून येत आहे कारण अनेक पाझर तलाव व साठवण तलावावरील बाळूवर महाकाय वृक्ष वाढल्यामुळे या ठिकाणच्या पाळूंना धोका निर्माण झाला आहे या वृक्षाची मुळे पाळूमध्ये खोलवर रुजत असल्यामुळे याचा धोका या तलावांना निर्माण झाला आहे .
जळकोट तालुका सह अनेक तालुक्यात शासनाने हजारो पाजर तलावे व शेकडो साठवंण तलावे बांधली आहेत. पाझर तलावातील तसेच साठवण तलावातील पाणी वाहून जाऊ नये यासाठी मजबूत अशा मातीचा बांध म्हणजेच पाळू टाकली जाते. यामुळे या पाळूवरच पाण्याची भीस्त अवलंबून असते. मोठ्या प्रकल्पांना लोखंडी दरवाजे असतात परंतु साठवण तलाव व पाझर तलावे यांना अशा प्रकारच्या गेटची सोय नसते यामुळे अशा प्रकारच्या साठवण तलावातील पाणी हे केवळ पाळूचा पाया पक्का कसा आहे यावर अवलंबून असते यामुळे पाटबंधारे विभागाकडून अशा तलावाचा पाया अधिक भक्कम करण्यात येतो परंतु नंतर मात्र या तलावाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात येते .
तलावाच्या निर्मितीवर शासन कोट्यवधी रुपये खर्च करते मात्र साठवण तलाव व पाझर तलाव यांच्या देखभालीसाठी काहीच उपाययोजना करीत नाही यामुळे नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत अनेक तलावांची निर्मिती पंधरा ते पंचवीस वर्षे होत आहेत . तसेच अनेक पाझर तलाव असे आहेत की त्यांची निर्मिती जवळपास २५ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे यामुळे या तलावावरील वाळूवर मोठे वृक्ष वाढले आहेत तसेच या वृक्षाची मुळे वाळूत खोलवर रुतून बसली आहेत यामुळे याचा अनेक साठवंण तलावे व पाझर तलावांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वृक्षाची मुळे खोलवर जात आहेत यामुळे पाळू मधील पक्का भाग थोडा कच्चा होत आहे. यामुळे पाण्याचा दाब वाढल्यास अनेक पाझर तलावांना व साठवण तलावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.