पुणे : पुण्यात स्वारगेट घटना ताजी असतानाच चक्क शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी रेखा कोंडे यांना अज्ञात व्यक्तीने सायकलने धडक दिली आणि त्यानंतर शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान,
तरुणाने सायकलने धडक दिल्यानंतर रेखा कोंडे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर कोंडेंनी हेल्पलाईनवर संपर्क केला असता लवकर मदत न मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर चौकात एक पोलिस कर्मचारी उभा होता, त्यांच्याकडे मदत मागितली असता, त्यांनी पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार करा, असे सांगितल्याचा आरोपही कोंडेंनी केला आहे.
पुणे शहरात पोलिसांची मदत लवकर मिळत नसल्याचे ठाकरे गटाच्या पदाधिकारी रेखा कोंडे यांनी सांगितले. राज्य महिला आयोगाने हेल्पलाईन नंबर देऊन पण तो लागत नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. आता मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.