पुणे : प्रतिनिधी
प्रभात रस्त्यावरील एका इमारतीत पार्किंगच्या मजल्यावरील वाहनांना अचानक आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडली. आगीत पाच दुचाकींसह एक कार जळून खाक झाली असून,या आगीची दोन कारला झळ बसली आहे. सुदैवाने यात कोणी जखमी झाली आही. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतून ८० वर्षांच्या ज्येष्ठ महिलेसह ७ जणांची सुखरुप सुटका केली.
प्रभात रस्त्यावरील कमला नेहरु पार्क परिसरात कृष्णा निवास ही दुमजली इमारत आहे. खाली वाहने पार्क केलेली असतात. दरम्यान, रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास पार्क करून ठेवलेल्या दुचाकींनी पेट घेतला. ही घटना लक्षात येताच नागरिकांनी याची माहिती अग्निशन दलाला दिली. तोपर्यंत आगीने पेट घेतला होता. पाच दुचाकींसह दोन कारला आगीने विळखा घातला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुर झाल्याने रहिवाशांची एकच धावपळ उडाली होती.
अग्निशमन दलाचे जवळ तीन बंब व टँकर घेऊन घटनास्थळी दाखल झाले. जिन्यात मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने जवान अग्निपोषाख घालून आत शिरले. त्यांनी पाण्याचा मारा करून काही वेळात आगीवर नियत्रंण मिळविले. परंतु, या पाच दुचाकी व दोन कार जळून खाक झाल्या असून, शेजारी लावलेल्या तीन मोटारींना आगीची झळ पोहोचली.
दरम्यान, धुरामुळे येथील रहिवाशी घाबरले होते. जवानांनी येथील एका फ्लॅटमधून ८० वर्षांच्या ज्येष्ठ महिलेसह तीन जणांना शिडीचा वापर करून बाहेर काढले.