24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeक्रीडापॅरालिम्पिकमध्ये भारताचा ‘सुवर्ण’ सोमवार

पॅरालिम्पिकमध्ये भारताचा ‘सुवर्ण’ सोमवार

सुमीत अंतिल, नितेश कुमारच्या सुवर्णांसह भारताच्या खात्यात आतापर्यंत १५ पदके

पॅरिस : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू नितेश कुमारने चमकदार कामगिरी करत देशाला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. तर भारताला तिसरे सुवर्णपदक भालाफेकमध्ये सुमीत अंतिलने जिंकून दिले. त्याने पुरुषांच्या एफ६४ भालाफेक स्पर्धेत हे सुवर्णपदक जिंकले. हे त्याचे पॅरालिम्पिकमधील दुसरे सुवर्णपदक आहे. त्याने याआधी टोकियो पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. पदकाच्यादृष्टीने भारतीय क्रिडापटूंनी प्रथमच दोन आकडी संख्या झळकावित तीन सुवर्णांसह आतापर्यंत एकूण १५ पदके मिळवीत भारताच्या सुवर्ण सोमवाराची नोंद केली.

नितीश कुमारने विजेतेपदाच्या लढतीत ग्रेट ब्रिटनचा खेळाडू डॅनियल बेथॉलचा पराभव केला. यासह, नितीशने पॅरालिम्पिकमध्ये भारताला दुसरे सुवर्ण जिंकले आहे. थाळी फेकमध्ये योगेश कथुनियाने रौप्यपदक जिंकले आहे. त्याने पुरुषांच्या थाळी फेकमध्ये एफ५६ स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. योगेश कथुनियाचा पहिला थ्रो ४२.२२ मीटर होता. यानंतर, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा अनुक्रमे ४१.५० मीटर, ४१.५५ मीटर, ४०.३३ मीटर आणि ४०.८९ मीटर होता. त्यानंतर रात्री थुलासिमाथी मुरूगेसन व मनीषा रामदास यांनी महिला एकेरीच्या एसयू ५ गटात अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली.

भारताच्या सुहास यथिराज आणि सुकांत कदम यांच्यात पुरुष एकेरीत एसएल४ प्रकारात उपांत्य सामना झाला होता. या सामन्यात अव्वल मानांकित सुहास यथिराजने २१-१७, २१-१२ अशा फराकाने सुकांतचा पराभव केला होता. सुवर्णपदकाच्या लढतीत सुहाससमोर फ्रान्सच्या लुकास माझूर याचे आव्हान होते. लुकासने पहिला गेम २१-९ असा जिंकला. दुसरा गेमही फ्रान्सच्या खेळाडूने २१-१३ असा जिंकल्याने भारतीय खेळाडूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कांस्यपदकाच्या लढतीत शीतल देवी आणि राकेश कुमार या भारतीय जोडीने इटलीच्या तिरंदाजांना हरवले. दोन फेरीनंतर ७८-७८ अशा बरोबरीमुळे चुरस पाहायला मिळेल असे वाटले होते. पण, तिस-या फेरीत इटालियन जोडीने १ गुणाच्या फरकाने आघाडी घेतली अन धाकधुक वाढली. पण, चौथ्या फेरीत भारतीय जोडीने १५६-१५५ अशी बाजी मारली आणि कांस्यपदक नावावर केले. तिरंदाजीतील हे भारताचे पहिलेच पदक ठरले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR