लातूर : प्रतिनिधी
येथील डॉ अशोक पोद्दार यांच्या पोद्दार हॉस्पिटल अँड ट्रॉमा केअर सेंटरच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ९६ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. या मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन गृह पोलीस उपअधीक्षक गजानन भातलवंडे, माजी उप महापौर कैलास कांबळे, डॉ. चेतन सारडा, डॉ. दीपक गुगळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी पाणपोईचे उद्घाटनही करण्यात आले. या शिबिरात एकूण ९६ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यामध्ये ६० रुग्णांची हाडांची ठिसूळता, ४२ रुग्णांचे एक्सरे, ६५ रुग्णांची फिजिओथेरपी व २२ रुग्णांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. यावेळी गृह पोलीस उपअधीक्षक गजानन भातलवंड, माजी उपमहापौर कैलास कांबळे, डॉ. चेतन सारडा, डॉ. दीपक गुगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी सिकंदर पटेल, अरुण कामदार, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. इमरान कुरेशी, डॉ. पल्लवी जाधव, डॉ. निकिता ब्रिजवासी, डॉ. किरण तांदळे, डॉ. ऋषिराज दोरवे, डॉ. भोसगे, डॉ. अनिशा, डॉ. गायत्री बनसोडे, व्यवस्थापक वसीम शेख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.