24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रपोलिस कर्मचा-याच्या मुलाची हत्या

पोलिस कर्मचा-याच्या मुलाची हत्या

नाशिक : प्रतिनिधी
पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेरी कंपाऊंडमध्ये मध्यरात्री एका निवृत्त पोलिस कर्मचा-याच्या मुलाची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या पंचवटी परिसरातील मेरी कंपाऊंड भागात मराठा समाजाच्या वसतिगृहाबाहेर गगन प्रवीण कोकाटे (वय २८) रा. वृंदावन नगर, म्हसरूळ, नाशिक या युवकाची मंगळवारी, २० तारखेला मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात संशयितांनी डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली. ही घटना सकाळी काही लोकांच्या निदर्शनास आल्याने उघडकीस आली आहे. याबाबत सकाळी सात वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात गगन याचा मृतदेह आढळून आल्यानंतर याची माहिती पंचवटी पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, पोलिस निरीक्षक ज्योती आमने यांच्यासह पोलिस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

यावेळी पोलिसांना गगन याच्या खिशातून एक चिठ्ठी मिळाली असल्याची माहिती आणि ही हत्या प्रथमदर्शनी प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा संशय वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR