मुंबई : प्रतिनिधी
सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, लेखक कवी प्रीतीश नंदी यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आकस्मिक निधनाने चित्रपटसृष्टीलाच नव्हे तर कला आणि साहित्य जगतालाही मोठा धक्का बसला. त्यांनी चमेली आणि प्यार के साइड इफेक्ट्स यांसारखे सिनेमे केले होते.
प्रीतीश नंदी यांच्यासाठी त्यांचे जवळचे मित्र अनुपम खेर यांनी खास पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनुपम खेर यांनी प्रितीश यांचे फोटो शेअर करत लिहिले की, माझा सर्वात प्रिय आणि जवळच्या मित्रांपैकी एक प्रीतीश नंदी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झाले आणि धक्का बसला. कवी, लेखक, चित्रपट निर्माता आणि एक धाडसी आणि जबरदस्त पत्रकार. मला भेटलेल्या सर्वात निडर लोकांपैकी तो एक होता.
१५ जानेवारी १९५१ रोजी जन्मलेल्या प्रीतीश नंदी यांनी दूरदर्शन, झी टीव्ही आणि सोनी टीव्हीवर ५०० बातम्या आणि चालू घडामोडींचे शो केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी २४ चित्रपट केले. ज्यात चमेली आणि प्यार के साइड इफेक्ट्स व्यतिरिक्त त्यांनी सूर, कांटे, हजारों ख्वैशीं ऐसी, एक खिलाडी एक हसीना आणि एक खिलाडी एक हसीना या चित्रपटांची निर्मिती केली.
मालिकेला एमी
नॉमिनेशन मिळाले
प्रीतीश नंदींच्या निर्मिती कंपनीने फोर मोअर शॉट्स प्लीज! या वेब सीरिजची निर्मिती केली होती. या वेब सीरिजला २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय एमी नामांकन मिळाले. प्रीतीश नंदी हे खासदारही होते. ते सहा वर्षे संसद सदस्य होते.