26.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रफडणवीस सुसंस्कृत असल्याचे वाटत होते

फडणवीस सुसंस्कृत असल्याचे वाटत होते

कराड : देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत असल्याचे मला वाटत होते, पण हा माझा गैरसमज होता. त्याचबरोबर मी आंतरराष्ट्रीय दर्जाचा राजकारणी असल्याचे सांगत मी काही सडकछाप राजकारणी नाही हे त्यांनी मला सर्टिफिकेट दिले आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद असे खोचक उत्तर पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड दक्षिण मतदारसंघात घेतलेल्या प्रचारसभेत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभेचे मटेरियल नसून ते इंटरनॅशनल मटेरियल आहे, विकास कामांच्या फाईलवर सही करताना आमच्या हाताला लकवा मारत नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण चांगलेच तापले आहे, काँग्रेसकडून फडणवीसांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे, तसेच त्यांनी याबद्दल माफी मागावी अशी मागणी देखील होते आहे. दरम्यान आता यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की काहीही झालं तरी मी माझा सुसंस्कृतपणा सोडणार नाही. ते कराडच्या शेरे येथे झालेल्या सभेत बोलत होते.

राजकारण तापले
दरम्यान कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील एका प्रचार सभेत बोलताना फडणवीस यांनी चव्हाणांबद्दल हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR