अर्थव्यवस्था तिस-या स्थानी तर ८० कोटी लोक पाच किलो धान्यासाठी रांगेत का?

गोंदिया : भारतीय अर्थव्यवस्था तीन ट्रिलियनची झाली असून जगात तिस-या स्थानी असल्याचे मोदी सरकार सांगत आहे. अर्थव्यवस्था बळकट होत असेल तर ही खरच आनंदाची बाब आहे; पण हे खरे आहे तर भारतातील ८० कोटी लोक ५ किलो मोफत धान्यासाठी रांगेत का, हा विरोधाभास नेमका कशामुळे आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे नव्हे तर आपल्या जवळच्या मित्रांचे हित साधल्याने असल्याची टीका एनएसयुआयचे अखिल भारतीय प्रभारी कन्हैयाकुमार यांनी केली.

महाविकास आघाडीतील काँग्रेसचे गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी शहरातील भीमनगर मैदानावर आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते.

कन्हैयाकुमार म्हणाले, संविधानाने तुम्हाला मतदानाचा सर्वात मोठा अधिकार दिला आहे. हा अधिकार झोपडीत व बंगल्यात राहणा-यांना सुध्दा सारखाच असून हीच खरी संविधानाची ताकद आहे. त्यामुळे तुम्ही केवळ मतदार नाही तर भविष्य घडविणारे आहात. जीवनात एखादी चूक झाली तर ती त्वरित सुधारता येते पण मतदानाच्या वेळी तुम्ही चूक केली तर त्याची शिक्षा ही पाच वर्ष तुम्हाला भोगावी लागते. महाराष्ट्रात होत असलेली निवडणूक ही महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाची आहे. त्यामुळे सजग राहून मतदान करून महायुती नव्हे महापापी सरकारला धडा शिकवा. महाराष्ट्रात सत्ता कोणाची हे गुजरातचे व्यापारी ठरवू शकत नाही, ते येथील मतदारच ठरविणार हे भ्रष्ट महायुती सरकारला दाखवून द्या, असे आवाहन कन्हैयाकुमार यांनी केले.

पक्ष फोडणारे जनतेचे कसे
महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य व संताची भूमी म्हणून ओळखले जाते. पण भाजपने येथे पक्ष फोडून कुटुंबात कलह निर्माण करण्याचे काम केले. खा. शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्या ह्यातच त्यांच्या पक्षाचे चिन्ह चोरले, कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पक्ष फोडून घरात फूट पाडणारे जनतेचे कसे होऊ शकतात, असा सवालही कन्हैयाकुमार यांनी यावेळी केला.

त्यांनी महाराष्ट्राला डाग लावला
५० खोके घेऊन पक्षाशी गद्दारी करणारे ते आमदार नव्हे तर गद्दार होत. त्यांनी केवळ पक्षाशी नव्हे तर संविधान आणि महाराष्ट्राच्या संस्कृती, अस्मितेशी गद्दारी केली. अशी गद्दारी करून त्यांनी महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीला डाग लावण्याचे काम केल्याची टीका कन्हैयाकुमार यांनी केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news