25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयबंगालमध्ये ममतांची जादू कायम, भाजपला फटका

बंगालमध्ये ममतांची जादू कायम, भाजपला फटका

कोलकाता : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशात मतमोजणी सुरू आहे. निवडणूक निकालांच्या सुरुवातीच्या निकालामध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींची जादू पुन्हा एकदा कामी आली असे दिसत आहे. भाजपचे सर्व दावे फोल ठरताना दिसत आहेत. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी बहरमपूरमधून आघाडीवर आहेत.

 

पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ४२ जागांवर नजर टाकली तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची टीएमसी आघाडीवर आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, टीएमसी ३२ जागांवर पुढे आहे, तर भाजपला ९ जागा मिळू शकतात. काँग्रेस २ जागांवर आघाडीवर आहे. तर आसनसोलमधून टीएमसीचे उमेदवार आणि बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा पिछाडीवर आहेत.

मागील निवडणुकीची आकडेवारी पहा

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार असून, त्याचा लोकसभा निवडणुकीत फायदा होताना दिसत आहे. २०१९ च्या गेल्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाल्यास, टीएमसीला २२ जागांवर, भाजपने १० जागांवर आणि काँग्रेसने २ जागांवर विजय मिळवला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR