21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयबसचा चुराडा; एकाच कुटुंबातील ७ जण ठार

बसचा चुराडा; एकाच कुटुंबातील ७ जण ठार

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बस अपघातामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले. अंबाला-दिल्ली-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकने मिनी बसला जोराची धडक दिली त्यामुळे हा अपघात झाला.

शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, मिनी बसचा पूर्ण चुराडा झाला आहे. मिनी बसमधून एकाच कुटुंबातील ३० सदस्य जम्मू काश्मीरमध्ये वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होते.

प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार, ट्रकने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे मागून येणा-या मिनी बसने ट्रकला मागून जोराची धडक दिली. मिनी बस चालक वेळेत गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही आणि त्याने ट्रकला मागून ठोकले.

घटनास्थळावरील दृश्ये भयानक आहेत. यावरुन मिनी बसची किती जोराची धडक बसली असेल याचा अंदाज येतो. ट्रकच्या समोर एक कार होती. कार चालकाने पेट्रोल पंप पाहून डाव्या दिशेने टर्न घेतला. त्यामुळे ट्रक चालकाला अचानक ब्रेक मारावा लागला. पण, मागे असलेल्या मिनी बसला वेळेत ब्रेक मारता आला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR