36.4 C
Latur
Wednesday, April 30, 2025
Homeक्रीडाबांगलादेशचा न्यूझिलंडवर विजय

बांगलादेशचा न्यूझिलंडवर विजय

मुंबई : बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांची वनडे मालिका न्यूझिलंडने जिंकली. सुरुवातीचे दोन सामने जिंकत न्यूझिलंडने आघाडी मिळवली होती. पण तिस-या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला. बांगलादेशने तिस-या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय योग्य ठरला असेच म्हणावे लागेल. कारण न्यूझिलंडचा संपूर्ण संघ अवघ्या ९८ धावांवर तंबूत परतला. तसेच बांगलादेशसमोर विजयासाठी ९९ धावांचे आव्हान मिळाले. बांगलादेशने हे आव्हान १५.१ षटकांत अर्थात ९१ चेंडूंत १ गडी गमवून पूर्ण केले. बांगलादेशचा न्यूझिलंडच्या धरतीवरील हा पहिला वनडे विजय आहे. यापूर्वी बांगलादेशने न्यूझिलंडमध्ये १८ वनडे सामने खेळले आहेत आणि त्या प्रत्येक सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

न्यूझिलंडने विजयासाठी दिलेले ९९धावांचे आव्हान गाठण्यासाठी सौम्या सरकार आणि अनामुल हक जोडी मैदानात आली. पण चार धावांवर असताना सौम्या रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर अनामुल हक आणि नजमुल होसेन शांतो यांनी विजयी भागीदारी केली. अनामुल ३७ धावा करून बाद झाला. तर शांतोने नाबाद ५१ आणि लिटन दास नाबाद १ धावांवर राहिले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR