नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाच रुपयांची जाडी नाणी बंद करण्याचे कारण समोर आले आहे. नाण्याच्या उत्पादनात वापरण्यात येणारा धातू वितळवून चार ते पाच ब्लेड बनवता येतात. ज्यांची किंमत ५ रुपयांपेक्षा जास्त असते. या आर्थिक कारणामुळे सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने ही पाच रुपयांची नाणी बंद केल्याचे सांगण्यात येत आहे. एका पाच रुपयांच्या नाण्यापासून ४-५ ब्लेड बनवण्यात येतात. ज्याची एकूण किंमत १० रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच नाण्यांच्या किंमतीपेक्षा त्याची किंमत अधिक भरत आहे.
तसेच, बांगलादेशात या नाण्यांची अवैधरित्या तस्करी केली जात असल्याचेही समोर आले आहे. बांगलादेशात ही नाणी वितळवून त्याचे रेझर ब्लेड बनवण्यात यायचे. एका नाण्यापासून सहा ब्लेड बनवण्यात येऊ शकतात. ज्याची किंमत प्रति ब्लेड किमान २ रुपये इतकी आहे. नाण्यातील धातूचे आंतरिक मूल्य त्याच्या आर्थिक मूल्यापेक्षा जास्त आहे. या आणि अशा अनेक कारणांमुळे आरबीआयने जाड पाच रुपयांच्या नाण्यांसारखी इतर काही नाण्यांचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला.
या सर्व समस्या लक्षात घेऊन सरकार आणि आरबीआयने पाच रुपयांच्या नाण्याचे डिझाइन आणि धातुत बदल केला आहे. नवीन शिक्क्यांची जाडी कमी करुन त्यात स्वस्त धातुंचे मिश्रण टाकण्यात आले आहे. त्यामुळे ही नाणी वितळवून त्यांपासून ब्लेड बनवणे कठिण आहे. केंद्र सरकार आणि आरबीआयने वेळीच हा मुद्दा सोडवून नाण्यांच्या तस्करीवर लगाम लावला आहे.