लातूर : प्रतिनिधी
मागील काहि दिवसापासून शहरातील बाजारपेठेत फळाच्या राजाची आवक मोठ्या प्रमाणात होत असताना दिसून येत आहे. फळाचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा शहरातील बाजापेठेत चागंलाच भाव खात आहे. सध्या फळांचा राजा बाजारपेठेत दाखल झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यदा अंबाच्या दरात १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या बाजारात हापूसचा दर १२०० ते १३०० रुपये डझन इतका आहे. हापूसबरोबरच इतरही आंब्यांची बाजारात आवक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, दर कमी होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तविली जात आहे.
हंगामातील सर्वाधिक प्रतक्षिेत असलेला फळांचा राजा म्हणजेच हापूस रमजान महिना संपताच बाजारात दाखल होतो. मात्र यदा एप्रिल महिन्याच्या दुस-या आठवड्यात हापूस आंब्याची आवक होण्यास सुरूवात झाली आहे. त्याबरोबरच केसर, बादाम, कलमी, शेप्या व इतर आंब्यांची आवकही वाढण्यास सुरुवात आहे. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या प्रारंभी किंवा मे महिन्याच्या प्रारंभी बाजारात देवगड हापूससह, लालबाग, राजापूरी, रत्नागिरी व अन्य आंबे दाखल होतील असे व्यापा-यांनी सागीतले. सध्या शहरातील छत्रपती शिवाजी महार चौक, औसा रोड, अंबाजोगाई रोड, गांधी चौक, गंजगोलाई, डॉ. बाबासाहेब आंबेंडकर चौक यासह शहराच्या आदी भागात किरकोळ व्यापा-यांनी आंबे विक्रीची दुकाने थाटली आहेत. सध्या बाजारात आंब्याची आवक म्हणावी तशी वाढत असली तरी, हापूस अजूनही भाव घात असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. ३० एप्रिल रोजी अक्षयतृतीया हा सण असून, या दिवशी ‘आमरस’चा बेत आखला जातो. त्यामुळे अक्षयतृतीयापर्यंत हापूसचे दर कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्या चांगल्या दर्जाच्या हापूस १२०० ते १४०० रुपये डझनप्रमाणे विकला जात आहे. गतवर्षी हा दर एक हजार ते बाराशे रुपये इतका होता. आता त्यात वाढ झाली आहे.
किरकोळ बाजारात हापूस ३०० ते ४०० रुपये किलो, कलमी १४० ते २०० रूपये किलो, केसर १५० ते २०० रूपये किलो दराने विकला जात आहे. इतर आंब्यांचे दर देखील १५० ते २०० रुपये किलो आहेत. दरम्यान, गतवर्षी अवकाळी पावसाने आंबा हंगामाचे मोठे नुकसान केले होते. त्यामुळे हंगामाच्या अखेरपर्यंत दर चढे होते. तुलनेत यंदा अवकाळीचा फारसा फटका बसला नसल्याने, पुढच्या काळात शहरातील बाजारपेठेत आंब्यांची आवक वाढण्याची शक्यता असून, दर आटोक्यात येतील असे विक्रेते सांगत आहेत.