24.2 C
Latur
Wednesday, July 16, 2025
Homeलातूरबाजारात केळीची गोडी वाढली

बाजारात केळीची गोडी वाढली

लातूर: प्रतिनिधी
शहरातील बाजारात दिवसेंदिवस दर्जेदार केळीची आवक वाढत आहे. परंतु दरात अल्पक्ष वाढ  झाली आहे. कमी दर्जाच्या केळीचे दर क्ंिव्टलमागे ५० ते ६० रुपयांनी कमी झाल्याची माहिती शहरातील व्यापा-यांनी दिली. शहरातील बाजारात केळीची आऊक ही टिंबुरणी, नादेड, अक्लकोट येथुन सुरू आहे. रमजानच्या पाश्र्­वभूमीवर केळी दरात मोठी सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सध्या तशी सुधारणा दिसत नाही. केळीची आवक या महिन्यात ब-यापैकी वाढली आहे. थंडीची बाधा न झालेल्या केळीस प्रतिक्ंिव्टल १६०० रुपये दर आहे. तर किमान दर १००० ते १२०० रुपये प्रतिक्ंिव्टल आहेत.
बारामाही बाजारात उपलब्ध असलेल्या केळीला सध्या शहरातील बाजारपेठेत मोठी मागणी आहे. सध्या टिंबुरणी, अक्लकोट या भागात चांगल्या प्रतीच्या केळीची काढणी सुरु आहेत. सध्या नादेंड जिल्ह्यातील भागात केळीची काढणी कमी असली तरी मे जुन मध्ये बाजारात नादेंडची केळी दाखल होणार असल्याचे व्यापारी सादीक बागवान यांनी एकमतशी बोलताना सागीतले आहे. त्याच बरोबर टिंबुरणी, अक्लकोट येथे केळी काढणी कामाला वेग आला आहे. कमी दर्जा असलेल्या केळीला बाजारात ७५० प्रतिक्ंिव्टल दर मिळत आहे. बाजारपेठेत चांगल्या प्रतीच्या केळीला १४३३ रुपये प्रतिक्ंिव्टल दर मिळात असल्याचे व्यापारी वर्गाने सागीतले आहे. शहरातील बाजारपेठेत गेल्या काही दिवसापासून केळीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. बाजारात चार दिवसाला ४ ते ५ टन केळीची आवक होत आहे. त्याच बरोबर विविध फळेही दाखल होत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR