25.4 C
Latur
Monday, March 3, 2025
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये महायुतीत जुंपली

बीडमध्ये महायुतीत जुंपली

एमआयएममध्ये जाण्याची माजी आमदार बाळासाहेब आजबे यांची धमकी

बीड : प्रतिनिधी
महायुतीमध्ये असताना बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून आमची कामं अडवली, कार्यकर्त्यांची बिले अडवली. या संदर्भात तक्रार करूनही महायुतीत दखल घेतली जात नसेल तर स्वतंत्र निर्णय घेऊ भलेही एमआयएममध्ये जाऊ, असा इशारा बीडच्या आष्टी मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिला आहे.

बाळासाहेब आजबे यांनी रविवारी (२ फेबु्रवारी) बीडमध्ये पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले. यावरून आष्टी मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले. बीडमध्ये भाजप आणि अजित पवार गट यांच्यामध्ये वादाची ठिणगी उडाली आहे.

मी अन्याय सहन करणारा माणूस नाही. माझ्या पार्टीने माझी दखल घेतली नाही तर एमआयएममध्ये जायची पाळी आली तरी माझी तयारी आहे, असा इशारा बाळासाहेब आजबे यांनी दिला. तसेच, ‘माझ्या कुटुंबाला अटक करण्यासाठी खोटे पत्र दिले आहे. तिथे उजडेल तिथे उजडेल. आता मी तुमचे प्रकरण काढतो आणि तुम्ही माझे प्रकरण काढा. सुरेश धस यांना कुठेही सुटी देणार नाही, असे देखील बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.

तसेच, ‘मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळविले आहे. अजितदादांनाही सांगितले आहे. आम्हाला जर महायुतीमध्ये असताना कामं चालू करणे आणि बिल करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर निर्णय घेऊ’, असा इशारा माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR