39.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रबुलडाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

बुलडाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

बुलडाणा : देवदर्शनासाठी निघालेली भाविकांची खासगी बस उभ्या ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात ३८ प्रवासी जखमी झाले असून ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. ही घटना नांदुरा दरम्यानच्या वडनेर भोलजी काटी फाट्याजवळ आज पहाटे घडली. जखमींना उपचारासाठी मलकापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ९ जखमींना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे पाठवण्यात आले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वरील मलकापूर ते नांदुरा दरम्यान वडनेर भोलजी नजिक काटी फाट्याजवळ पहाटे ३ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खाजगी बस उभ्या ट्रकवर धडकली. घटना घडताच जवळच असलेल्या एका ढाब्यावर उपस्थित असलेल्या लोकांनी लगेच धाव घेऊन मदत केली.

मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळे गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली. ते घटनास्थळी दाखल झाले. तातडीने जखमींना उपचारासाठी मलकापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ९ जखमींना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे पाठवण्यात आले. तर ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. भाविक आंध्र प्रदेश राज्यातील कडप्पा येथील असून ते नाशिक, शिर्डीला देवदर्शनासाठी जात होते.

बुलडाणा जिल्ह्यात मुख्यत: घाटाखाली मागील दोन आठवड्यांमध्ये तीन भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातांमध्ये जवळपास आठ ते दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यत: सकाळच्याच वेळेस आणि रात्रीच्या वेळेस हे अपघात झाल्याचे समोर येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR