37.1 C
Latur
Tuesday, April 22, 2025
Homeमहाराष्ट्रबॉयफ्रेंडच्या घरातच आढळला तरुणीचा मृतदेह

बॉयफ्रेंडच्या घरातच आढळला तरुणीचा मृतदेह

जालना : प्रतिनिधी
जालन्यातील भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर गावात १८ वर्षीय तरुणीने टोकाचा निर्णय घेतला. बॉयफ्रेंडच्या बदनामीच्या धमकीला कंटाळून शिवानी गिरी या १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. शिवानीचा मृतदेह तिच्या प्रियकराच्या घरी आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी आरोपी विशाल आघाम याच्यासह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, शिवानीच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपास भोकरदन पोलिस करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे

. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. नातेवाईकांच्या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR