31.1 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeसोलापूर ब्राह्मण संघाच्यावतीने सावरकर पुण्यतिथी

 ब्राह्मण संघाच्यावतीने सावरकर पुण्यतिथी

सोलापूर –
ब्राह्मण महासंघाच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी किल्ला बागेजवळील सावरकर मैदानावर साजरी करण्यात आली.शिवस्मारक येथे अलीकडेच झालेल्या ब्राह्मण महासंघाच्या मेळाव्यात या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या मैदानाचे नाव बदलून आसार मैदान करण्यात आले होते. ते पूर्वीप्रमाणे सावरकर मैदान असे नामकरण करून फलक लावण्यात आला. याचठिकाणी सावरकर पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

शिवस्मारक येथील मेळाव्यात ब्राह्मण महासंघाच्या सोलापूर जिल्ह्याचे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. अध्यक्षपदी अनिल कुलकर्णी, महिला अध्यक्ष म्हणून श्रद्धा अध्यापक, सरचिटणीसपदी अमोल कुलकर्णी (खडर्डीकर), शहराध्यक्षपदी व्यंकटेश देशपांडे, प्रांजली हिंगे, कीर्ती देशपांडे, वकील आघाडीसाठी माधुरी देशपांडे, अ‍ॅड. ऊर्मिला जहगिरदार, जिल्हा युवक आघाडीसाठी अमृता बडवे यांच्या नियुक्ती करण्यात आली.

यावेळी बार्शीचे पदाधिकारीही निवडण्यात आले. ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे, चैतन्य जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. उद्योग, व्यापार, पतसंस्था कार्याचा आढावा प्रदेश अध्यक्ष प्रवीण शिरसीकर यांनी घेतला. यावेळी श्रद्धा अध्यापक, प्रेमलता वैद्य, दिनकर सापनाईकर, परिणीता कुलकर्णी, आरती फडके, अ‍ॅड. जहागीरदार पौर्णिमा कुलकर्णी यांच्यावर विविध जबाबदारी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती देशपांडे यांनी केले तर आभार मधुरा वडापूरकर यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR