21.9 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रभरधाव कार नदीपात्रात कोसळली; ३ ठार

भरधाव कार नदीपात्रात कोसळली; ३ ठार

सांगली : प्रतिनिधी
सांगलीमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदी पुलावरून भरधाव गाडी कोसळून तीनजण ठार, तर तीनजण गंभीर जखमी झाले असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. जखमींमध्ये एका पाच वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

मध्यरात्री एकच्या सुमारास कोल्हापूरवरून सांगलीकडे येताना अंकली पुलावर हा अपघात झाला. लग्न सोहळा आटोपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट कृष्णा नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला.

मृतांत दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. यातील मृत कुटुंबीय हे सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत. कोल्हापूर येथून एक लग्न सोहळा आटोपून हे कुटुंब सांगलीकडे येत होते. त्यांची गाडी जयसिंगपूरहून सांगलीकडे येत असताना अंकली पुलावर गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट नदीपात्रात कोसळली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये प्रसाद भालचंद्र खेडेकर (४०), प्रेरणा प्रसाद खेडेकर (३५) आणि वैष्णवी संतोष नार्वेकर (२३) यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये साक्षी संतोष नार्वेकर (४२), वरद संतोष नार्वेकर (२१) आणि समरजित प्रसाद खेडेकर या ५ वर्षीय बालकाचा समावेश आहे. हे सर्व सांगली आकाशवाणी केंद्रामागे असणा-या गंगाधर नगर येथील रहिवासी आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR