15.6 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरभविष्य बदलण्यासाठी अभिमन्यू पवारांना साथ द्या

भविष्य बदलण्यासाठी अभिमन्यू पवारांना साथ द्या

औसा / किल्लारी : प्रतिनिधी
निवडणूकीत तुम्हाला तुमचे चांगले भविष्य घडविणारे उमेदवार आहेत. तुमचे भविष्य बदलू शकते. जी पार्टी व जो नेता तुमचे भविष्य बदलू शकतो तो उमेदवार अभिमन्यू  पवार  यांच्या रुपाने उभा आहे. तुम्ही  अभिमन्यू पवार यांच्या मागे उभे राहिलात तर या भागाचे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास तुम्हाला देण्यासाठी मी आलो आहे. जेव्हा विकासावर बोलता येत नाही तेंव्हा लोकांना कन्फ्यूज करण्याचे काम केले जाते. लोकसभेत आशा प्रकारे भाजपच्या संदर्भात चुकीचा गैरसमज लोकांमध्ये पसरविण्याचे काम कॉग्रेसने केले आहे.
औसा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ किल्लारी येथे (दि.१२) रोजी आयोजित जनाशिर्वाद  सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री बसवराज पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश बिराजदार, लक्ष्मण भोसले, संताजी चालुक्य, मुक्तेश्वर वागदरे, संतोष मुक्ता, सुभाष जाधव, सुनील उटगे, ज्ञानेश्वर वाकडे, दत्तात्रय कोळपे, सभापती  चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती भिमाशंकर राचट्टे, किरण उटगे, सुधीर पोतदार, सरपंच सुलक्षणा बाबळसुरे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी  म्हणाले  की, राजकारणात जनता मालक तर लोकप्रतिनिधी सेवक आहे म्हणून आपण लोकांची सेवा करायची आहे. त्यांचे जीवन सुस  करायचे आहे. येथील आर्थिक व सामाजिक परिस्थिती बदलायची आहे. गाव, गरिब, मजूर, शेतक-यांचे कल्याण करायचे आहे. याची सतत मनामध्ये अस्वस्थता ठेवणारा संवेदनशील कार्यकर्ता म्हणून अभिमन्यू पवार यांंचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. त्यामुळे ही निवडणूक अभिमन्यू पवार यांच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही तर ही निवडणूक ख-या अर्थाने येथील जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक असल्याचे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
दलित व मुस्लिम समाजात संभ्रम व भिती निर्माण करण्याचे काम करण्यात आले. ज्या कॉग्रेस पार्टीने घटना तोडण्याचे काम केले आज तेच घटना घेऊन फिरत आहेत अशी टीका यावेळी कॉग्रेसवर करीत ख-या अर्थाने देश स्वतंत्र काळापासून ग्रामीण रस्ते विकासाचे काम केले असते तर शेतक-यांना आपला भाजीपाला व दुध शहरात विक्रीसाठी घेऊन जाता आला असता. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला असता तर शेतकरी आत्महत्या कशाला झाल्या असत्या हे सोडून तत्कालीन काँग्रेस सरकारने तेव्हा केवळ कंपन्या उभारण्याचे काम केले. त्या सर्व पुन्हा डबघाईला आल्या, असे यावेळी बोलताना गडकरी म्हणाले. या १० वर्षांच्या काळात सरकारची सर्वात मोठी उपलब्धा शेतक-यांंना अन्नदाता नाही तर ऊर्जादाता म्हणून पुढे आणून केली असून वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर व गाव विकासाला चालना देण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. या जनाशिर्वाद
सभेस मोठा जनसमुठाय उपस्थित होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR