28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रभाजपने जाहीर केलेले संकल्प पत्र विकसित भारताचा रोड मॅप

भाजपने जाहीर केलेले संकल्प पत्र विकसित भारताचा रोड मॅप

पुणे : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेले संकल्प पत्र विकसित भारताचा रोड मॅप असल्याचे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

जनतेच्या आशा-आकांक्षांना आकार देणारे हे संकल्पपत्र आहे. या संकल्पपत्रात दहा वर्षांतील पूर्वीच्या जाहीरनाम्यातील पूर्तता झालेल्या विकासकामे आणि योजनांचा आढावा घेतला आहे. अशी भूमिका या आधी कोणत्याही राजकीय पक्षाने मांडली नाही. दरवेळी फक्त नवीन जाहीरनामा प्रसिद्ध केला, असे ते म्हणाले.

भांडारी पुढे म्हणाले, २०४७ पर्यंत एक संपन्न, समर्थ राष्ट्र म्हणून उभे राहण्याचा संकल्प करण्यात आला आहे. युवक, महिला, शेतकरी अशा सर्व समाज घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी संकल्प पत्रात समावेश करण्यात आला आहे. रोजगार निर्मितीसाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. समान नागरी कायदा लवकरात लवकर लागू व्हावा ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. जोपर्यंत हा कायदा येत नाही तोपर्यंत महिलांना समान हक्क मिळणार नाहीत असेही भांडारी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR