15.6 C
Latur
Saturday, November 23, 2024
HomeUncategorizedभारत जगातील तिसरा शक्तिशाली देश, जपानला टाकले मागे

भारत जगातील तिसरा शक्तिशाली देश, जपानला टाकले मागे

ऑस्ट्रेलियाच्या संस्थेकडून निर्देशांक जाहीर

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात (एशिया पॉवर इंडेक्स) भारताने जपानला मागे टाकत तिसरे स्थान पटकाविले. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही माहिती दिली.

भारताच्या वाढत्या विकास दराबाबत ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेने २७ देशांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना या क्रमवारीमध्ये भारत ही तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असल्याचे वर्णन केले आहे. बा आक्रमणासह सर्वप्रकारची संकटे दूर ठेवण्याची एखाद्या देशाची क्षमता कितपत आहे, या निकषाच्या आधारे एशिया पॉवर इंडेक्समध्ये प्रभावी देशांची क्रमवारी ठरविली जाते.

कोरोनाच्या जागतिक साथीनंतर भारताचा आर्थिक विकास वेगाने झाला. अर्थव्यवस्थेचा विस्तार त्याचप्रमाणे युवकांच्या संख्येत वाढ या कारणांनी भारताची स्थिती मजबूत झाल्याने आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात देशाची कामगिरी सुधारली.

यामुळे जागतिक व्यासपीठावर भारताची भूमिका आगामी काळात आणखी महत्त्वाची होऊ शकते, असेही मानले जात आहे. गेल्यावेळी तिस-या क्रमांकावर असलेल्या जपानला भारताने मागे टाकले. या यादीत अमेरिका सर्वोच्च स्थानी असून चीनचा दुसरा क्रमांक आहे.

त्यानंतर भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि रशिया अशी क्रमवारी आहे. दुसरीकडे, भारताची सातत्याने कुरापत काढणा-या पाकिस्तानची स्थिती मात्र या क्रमवारीत आणखी बिकट झाली आहे. १४.४ गुणांसह पाकिस्तान १६ व्या स्थानावर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR