भारताचा गोल्डन डे!

एकाच दिवशी ८ सुवर्ण, बॉक्सरचा धमाका, ७ पदकांची कमाई
ग्लासगो : वृत्तसंस्था
भारतासाठी शनिवारचा दिवस गोल्डन डे ठरला. कारण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज एकाच दिवशी भारतीय क्रीडापटूंनी तब्बल ८ सुवर्ण पदकांची कमाई केली. यामध्ये भारतीय बॉक्सरनी सुवर्ण धमाका करीत एकाच दिवशी ७ सुवर्ण पदके पटकावली. सर्वप्रथम जॅस्मिन लांबोरिया (महिला ५७ किलो बॉक्सिंग), प्रीती पवार (महिला ५४ किलो बॉक्सिंग) या दोघींनी सुवर्ण कमाई केली. त्यानंतर साक्षी चौधरी (महिला ५१ किलो बॉक्सिंग), प्रिया घंसास (६० किलो बॉक्सिंग), अरुंधती चौधरी (७० किलो बॉक्सिंग) आणि अंकुश पंघाल (७५ किलो) आणि सचिन सिवाच (६० किलो) अशा ७ बॉक्सरनी सुवर्ण पदक पटकावले तर पॅरा एफ ५७ शॉट पुटमध्ये सोमन राणाने सुवर्ण कमाई केली. याच स्पर्धेत शुभम जुयालने रौप्य पदक मिळवत एकाच स्पर्धेत प्रथमच दुहेरी पदकाची कमाई करण्याचा मान या जोडीने मिळविला. विशेष म्हणजे आजच्या दिवशी भारताच्या ५ लेकींनी ५ सुवर्ण पदके पटकावली. एकूण १० बॉक्सरनी पदकांची लयलूट केली.

प्रारंभी जॅस्मिनने अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या मायकेला वॉल्शचा तर प्रीतीने कॅनडाच्या सवाना डोलमागोचा पराभव केला. यासोबतच साक्षी चौधरीने इंग्लंडच्या रुबी व्हाईटला, साक्षी चौधरीची चुलत बहीण प्रिया घंसासने कॅनडाच्या मारी-बथूल अल-अहमदियेहला आणि अरुंधती चौधरीने इंग्लंडच्या शँटल रिडला पराभूत करून सुवर्ण पदक पटकावले. यासोबतच भारतीय बॉक्सर अंकुश पंघालने इंग्लंडच्या डिमेजी शिट्टूचा पराभव केला. ७५ किलो वजन गटात ही लढत झाली तर सचिन सिवाचने नामिबियाच्या ट्रायअगेन मॉर्नी न्देवेलोचा पराभव करीत आठवे सुवर्ण पदक मिळविले. ६० किलो वजन गटात ही लढत झाली. या आधी पॅरा शॉट पुटमध्ये सोमन राणाने सुवर्ण कमाई केली होती. त्यामुळे बॉक्सिंगचे ७ आणि पॅरा शॉटमधील १ अशा ८ सुवर्ण पदकांची आज भारताने कमाई केली.

भारतीय बॉक्सरनी आज सुरुवातीला २ सुवर्ण पदकांची कमाई करून दिली. त्याचवेळी ७ भारतीय बॉक्सरनी अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे या बॉक्सरच्या कामगिरीकडे भारतीयांचे लक्ष लागले होते. या बॉक्सरनी भारतीयांचा विश्वास सार्थ ठरवित ७ सुवर्णची कमाई केली. यातील जादूमणी सिंग मांडेंगबाम (५५), लव्हलिना बोर्गोहेन (७५) आणि नरेंद्र बेरवाल (९०) या तीन भारतीय बॉक्सरना रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. यासोबतच पॉरा शॉट पुट (गोळाफेक) मध्ये भारताच्या शुभम जुयाललाही रौप्य पदक मिळाले.

एकाच प्रकारात
२ पदकांची कमाई
भारताच्या सोमन राणाने पॅरा शॉट पुट (गोळाफेक) स्पर्धेच्या एफ-५७ गटात हंगामातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत सुवर्णपदक जिंकले. याच स्पर्धेत भारताच्याच शुभम जुयालने रौप्यपदक मिळवले.

ट्रिपल जंपमध्ये
आणखी २ पदके
पुरुष गटातील ट्रिपल जंप प्रकारात भारताने आणखी दोन पदके जिंकली आहेत. प्रवीण चित्रवेलने १६.५८ मीटरची उडी मारून रौप्य पदक पटकावले तर त्याचा सहकारी भारतीय खेळाडू सेल्वा प्रभूने १६.५२ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह कांस्य पदक जिंकले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:18:26
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35

Latest news