32.7 C
Latur
Monday, May 12, 2025
HomeUncategorizedभारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर

भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर

रिसॅट-१बी । भारतीय सैन्याला पाकिस्तान, चीनच्या सीमेवर नजर ठेवण्यास मदत मिळणार; ५ वेगवेगळ्या इमेजिंग मोड

 

इंफाल : वृत्तसंस्था
भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतरही भारताकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. भारतीय अंतराळ संस्थेचे देशाच्या सुरक्षेसाठी १० सॅटेलाईट सतत काम करत आहेत. हे सॅटेलाईट २४ तास अवकाशातून सीमेवर लक्ष ठेवणार आहेत असं विधान इस्त्रोचे चेअरमन वी. नारायण यांनी केले. एग्रीकल्चरल यूनिवर्सिटीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. पाकिस्तानशी सुरू असलेल्या तणावात देशाच्या सुरक्षेसाठी इस्त्रो वैज्ञानिक सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी भारत-पाकिस्तान सीमेवर आता नवीन सॅटेलाईट कायम करडी नजर ठेवून असणार आहेत.

देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कमीत कमी १० सॅटेलाईट सातत्याने काम करत आहेत. तुम्ही सर्व आपल्या शेजा-याबाबत जाणता, जर आपल्याला देशाच्या सुरक्षेची काळजी घ्यायची असेल तर सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्याला सेवा करावी लागणार आहे. आम्ही आपल्या ७००० किमी सागरी किना-यावर लक्ष ठेवून आहोत, असे वी. नारायण म्हणाले.

RISAT-1B हे एक खास रडार इमेजिंग सॅटेलाईट आहे जे प्रत्येक वातावरणात काम करू शकते. पाऊस असो धुक्याची चादर किंवा रात्र, या सॅटेलाईटमधून पृथ्वीवरचे फोटो घेता येऊ शकतात. त्यात सी-ब्रँड सिंथेटिक एपर्चर रडार लावण्यात आले. हे रडार खूप चांगल्या क्वालिटीचे फोटो घेते. नेहमी जे कॅमेरेवाले सॅटेलाईट असतात ते खराब हवामानात अथवा रात्री चांगले फोटो घेत नाहीत परंतु फकरअळ-1इ प्रत्येक परिस्थितीत काम करते. याद्वारे भारतीय सैन्याला पाकिस्तान, चीनच्या सीमेवर नजर ठेवण्यास मदत मिळणार आहे. देशाच्या सागरी सीमेची सुरक्षाही होईल. हे सॅटेलाईट घुसखोरी रोखण्यसाठी आणि दहशतवाद विरोधी अभियानात फायदेशीर ठरेल.

दरम्यान, RISAT-1B दहशतवाद्यांना पकडण्यास मदत करेल. जर दहशतवादी सीमेतून घुसखोरी करत असतील तर त्यांच्या हालचाली सहजपणे टीपेल. या सॅटेलाईटमध्ये ५ वेगवेगळ्या इमेजिंग मोड आहेत. एका मोडमध्ये खूप लहान गोष्टीचाही फोटो घेता येऊ शकतो. दुस-या मोडमध्ये मोठ्या परिसराचा फोटो घेता येईल. या सॅटेलाईटचा मिलिट्रीसोबतच सर्वसामान्यांसाठीही उपयोग होईल. ज्यात शेती, जंगल, माती परिक्षण, भूविज्ञान, पूर यावरही लक्ष ठेवता येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR