मुंबई : प्रतिनिधी
अभिनेत्री भूमि पेडणेकर तिच्या ‘मेरे हसबेंड की बीवी’ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भूमिने या चित्रपटाबाबत न्यूज चॅनेलवर अनेक मुलाखती दिल्या आहेत. मुलाखतीदरम्यान भूमिने भारतात एक स्त्री म्हणून मला भीती वाटत असल्याचे स्पष्ट मत मांडले आहे.
दरम्यान, आजकाल महिलांवरील वाढते अत्याचार यावर भूमिने स्पष्ट मत मांडले आहे. भूमिने तिला नेहमीच तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेविषयी भीती वाटत असल्याचे म्हटले आहे. आज भारतात एक स्त्री म्हणून मला भीती वाटत असल्याचे तिने सांगितले. माझ्यासोबत मुंबईत राहणारी माझी धाकटी चुलत बहीण कॉलेजला जाते, तेव्हा मला भीती वाटते आणि ती रात्री ११ वाजेपर्यंत घरी आली नाही तर मला काळजी वाटत असल्याची ती म्हणाली.
जेव्हा पहिल्या पानावर फक्त महिलांविरोधात हिंसेच्या बातम्या येतात तेव्हा देखील ही एक समस्या आहे. ही काही आताची बातमी नाही. असे रोज होत असल्याचे ती म्हणाली. तसेच जस्टिस हेमा कमिटीच्या रिपोर्टबद्दल बोलताना भूमि म्हणाली, भारतीय समाजाचा भाग आहे. तिथे योग्य त्या प्रक्रियेला फॉलो करण्यात आले आहे. ज्यातून धक्का बसेल अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत.
भूमि पेडणेकर तिच्या ‘मेरे हसबेंड की बीवी’ चित्रपटाबाबत उत्सुक आहे. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन या चित्रपटातील कलाकारांकडून करण्यात येत आहे. २१ फेब्रुवारीला ‘मेरे हसबेंड की बीवी’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याशिवाय भूमि तिच्या आगामी प्रोजेक्टबाबत उत्सुक असून ‘दलदल’ या वेबसीरिजमध्ये ती एका पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे.