लातूर : प्रतिनिधी
भारतातील पहिले बीज संमेलन सह्याद्री देवराई व भारती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ व २६ एप्रिल रोजी पुण्यात होणार आहे. महाराष्ट्रातील सहा विभागात मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ या विभागातील संवेदनशील पण एक कार्य करणा-या ५० पेक्षा जास्त सामाजिक संस्था एकत्र येऊन भविष्यातील वाटचाल कशी असावी यासंदर्भात सह्याद्री देवराई आणि भारती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बीज संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सह्याद्री देवराईचे समन्वयक आणि या बीज संमेलनाचे संयोजन समिती सदस्य आणि समन्वयक सुपर्ण जगताप यांनी दिली.
या संमेलनाचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्मदेखील उपलब्ध करण्यात आला आहे. आत्तापर्यंत सहा झोनमधील अनेक संस्था यांनी सहभाग नोंदवला आहे. अजून ज्यांना सहभाग घ्यायचा आहे. त्यांनी हा रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा आणि या बीज संमेलनात सहभागी व्हावे असेही ते सह्याद्री देवराई लातूर समितीच्या वतीने सुपर्ण जगताप, रामवाडीचे सरपंच माधव नागरगोजे, डॉ. दशरथ भिसे, डॉ. बी. आर. पाटील, पुजा बोमणे, नंदिनी पडीले, भीम दुनगावे, अभय मिरजकर यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. परवा दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी याविषयी सर्व माहिती दिली. यावेळी सह्याद्री देवराईचे कवी लेखक अरविंद जगताप, भारती विद्यापीठाचे के. डॉ. जाधव सह्याद्री देवराईचे सुपर्ण जगताप, डॉ. तेजस्विनी बाबर, निलेश पाटील, स्मिता जगताप हे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाची रूपरेषा सुपर्ण जगताप, डॉ तेजस्विनी बाबर यांनी यावेळी सांगितली.
बीज संमेलन २०२५- पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. देशातील पहिले दोन दिवसीय बीज संमेलन निसर्गसंवर्धनाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल आहे. २५ एप्रिल रोजी बीज संकलन झाडाला इजा न करता कसे करायचे या विषयी कार्सयशाळा काळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत ताम्हिणी जंगलात आहे. बीज प्रदर्शनाचे उद्घाटन, पर्यावरण विशेष चर्चासत्र ठिकाण इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन ऍण्ड रिसर्च सेंटर, पुण-ऑडिटोरियम.
तसेच दि. २६ एप्रिल-बीज संमेलन मुख्य कार्यक्रम दुपारी ३ वाजता भारती विद्यापीठ, धनकवडी, पुणे. येथे होणार आहे. या कार्यक्रमाला बीजमाता राहीबाई पोपेरे यांना जीवनगौरव पुरस्कार हा आचार्य पंडित मुकुल शिवपुत्र यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. तसेच विजयमाला पतंगराव कदम यांची बीजतूला होणार आहे.