नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या काळात तुर्कस्तान आणि अझरबैजानने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक या दोन्ही देशांवर बहिष्कार टाकत आहेत. याच दरम्यान, ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्म एं२८ट८ळ१्रस्र चे सीईओ निशांत पिट्टी यांनी एक गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सवलतीच्या नावाखाली भारतीय सैनिकांचा डेटा चीनपर्यंत पोहोचवला जात आहे. यामुळे सोशल मीडियावर नवीन वादाला तोंड फुटले आहे.
निशांत पिट्टी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (ट्विटर) वर पोस्ट करत आरोप केला आहे की, काही ट्रॅव्हल कंपन्या भारतीय जवानांना विमान तिकीटांवर सवलत देत आहेत. या कंपन्यांमध्ये चीनची मोठी गुंतवणूक आहे आणि त्यामुळे भारतीय सैनिक कुठे प्रवास करत आहेत, त्यांच्या ओळखपत्राची माहिती, प्रवासाचा मार्ग आणि तारीख यांसारख्या संवेदनशील गोष्टी चीनपर्यंत सहज पोहोचत आहेत. पिट्टी यांनी थेट नाव न घेता टं‘ीट८ळ१्रस्र वर निशाणा साधला आहे.
पिट्टी यांच्या आरोपांना उत्तर देताना टं‘ीट८ळ१्रस्र ने म्हटले आहे की, त्यांची कंपनी पूर्णपणे भारतीय आहे. अशा वाईट हेतूने केलेल्या आरोपांना ते महत्त्व देत नाहीत.
पिट्टींनी सादर केले पुरावे
टं‘ीट८ळ१्रस्र च्या या उत्तरावर निशांत पिट्टी म्हणाले की राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर ते गप्प बसणार नाहीत. त्यांनी टं‘ीट८ळ१्रस्र च्या शेअरहोल्डर्सचे स्क्रीनशॉट शेअर केले. आणि दावा केला की टं‘ीट८ळ१्रस्र च्या १० बोर्ड संचालकांपैकी ५ जण चीनचे आहेत, ज्यांना चीनमधील ळ१्रस्र.ूङ्मे या कंपनीने नियुक्त केले आहे.