सोलापूर: भीम प्रतिष्ठान व सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. संजीव सदाफुले आणि जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदिपसिंह राजपूत यांना भीम प्रतिष्ठान यांच्या वतीने विधी भूषण उपाधीने गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक बाबा बाबरे,
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.. अमित वि. आळंगे (अध्यक्ष, बार असोसिएशन, सोलापूर), प्रा.डॉ. रावसाहेब पाटील (संविधान जागृती अभियान मार्गदर्शक व अभ्यासक), मा. दत्ता गायकवाड (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन व कार्य अभ्यासक) सदर कार्यक्रमास ॲड. विशाल मस्के,अकबर शेख ॲड. विनयकुमार कटारे, ॲड. दत्तूसिंग पवार, ॲड.अजय रनशृंगारे,ॲड. दिपक हूलसुरे, ॲड. बाबा जाधव, ॲड., स्वाती विशाल मस्के, अॅड, वैशाली गुप्ता, अॅड, नेहा उरुट आदी उपस्थित होते. आभार ॲड.मनोज पामुल यांनी केले.