सांगली : प्रतिनिधी
सांगलीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. वडापने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचे दोन तुकडे झाले आहेत.
हा अपघात तासगाव-सांगली रोडवरील कुमठेफाटा येथे झाला आहे. ओव्हरटेक करताना वडापने समोरून येणा-या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवर असलेल्या आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर, महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.