17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रभुजबळ-जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

भुजबळ-जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांचा विजय झाला. नाशिकच्या येवला या मतदारसंघातून छगन भुजबळ विजयी झाले आहेत. या मतदारसंघातील ओबीसी विरुद्ध मराठा अशा झालेल्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक जिंकल्यानंतर विजयी रॅली काढली. काही लोकांनी पहाटे तीन वाजेपर्यंत सभा घेतल्या. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही, असे म्हणत भुजबळांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर निशाणा साधला आहे. यावर आता जरांगे यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे.

येडपटा तुला सांत्वन भेटी कळतात की नाही, मी राज्यात कुठे गेलो का? आलेले सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आलेले आहे. आम्ही मैदानात पाहिजे होतो तेव्हा दाखवला असता कचका. आमच्या पॅटर्नचा मराठा आरक्षण लवकर द्यायचे, बेमानी करायची नाही. मी आणि माझा मराठा समाज मैदानात नव्हतो. सरकारने तातडीने मराठा आरक्षण द्यावे नाही तर पुन्हा मराठे छाताडावर बसणार आहेत. आमच्याशी बेमानी करायची नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा इशारा दिला आहे.

तुमचे सरकार स्थापन झाले की बैठक घेऊन लगेच सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करणार आहे. सरकार आलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. मोठ्या मनाने अभिनंदन देखील केले पाहिजे. आमचं समीकरण जुळलं नाही म्हणून आम्ही बाजूला राहिलो. कोणाचीही सत्ता आली तरी मला आणि समाजाला संघर्ष करावा लागणार आहे. कोणीही माजात आणि मस्तीत राहायचे नाही, हुरळून जायचे नाही. मराठ्यांना छेडण्याचे काम करायचं नाही. मी निवडणुकीत सांगितले होते मराठा समाज मालक आहे. योग्य लोक निवडा. मी मराठा मुक्त केला होता, मी कोणाच्याही दावणीला बांधला नव्हता, असे जरांगे म्हणाले.

मी मैदानात नव्हतो तर फॅक्टर फेल कसा?
मराठ्यांशिवाय राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही. काल देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितले की मराठा समाज भाजपसोबत होता. मराठ्यांची विभागणी होऊ शकत नाही. मीच मराठा समाजाला मुक्त केले होते. मराठ्यांना जे योग्य वाटले ते मराठ्यांनी केले आहे. मी मैदानात नव्हतो तर फॅक्टर फेल कसा झाला? एक महिनाभर थांबा तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल. या निवडणुकीत मराठ्यांचे २०४ आमदार झाले आहेत. मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणीही सत्तेत येऊ शकत नाही, असे जरांगेंनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR