21.1 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeलातूरभ्रष्ट महायुती सरकारची बिघडलेली डीपी काढा अन् हातावर शिक्का मारा

भ्रष्ट महायुती सरकारची बिघडलेली डीपी काढा अन् हातावर शिक्का मारा

लातूर : प्रतिनिधी
राज्यांतील सत्तेवर असलेल्या महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात सर्वच समाजाला झुलत ठेवण्याचं काम केले आहे एवढ्यावर न थांबतात लोकांचे घरे फोडली असून आता सरकारचा निर्णय जनता आदालती मध्ये आहे. त्यामुळें असंवेदनशील सरकारला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी हाताच्या पंजाच्या समोर बटन दाबा सरकारचा डिपी उडेल, असा घणाघात राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले ते रेणापूर तालुक्यातील आराजखेडा येथे शुक्रवारी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार धिरज  विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ मतदाराशी संवद बैठकीत बोलत होते.
यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील  रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव सुरेश लहाने बाजार समितीचे उपसभापती शेषराव हकीम लालासाहेब चव्हाण उमाकांत खलंगरे, आशाताई भिसे, हरिराम कुलकर्णी, बाजार समितीचे संचालक प्रकाश सूर्यवंशी, किशोर सूर्यवंशी, रमेश सोनवणे, राजकुमार सूर्यवंशी, परमेश्वर सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील, महादेव पाटील, गोपाळ भोसले, वामन पाटील, अ‍ॅड. रमेश पाटील, सुग्रीव मुंडे, चंद्रकांत पाटील, हणमंत पवार, पप्पू स्वामी, प्रभाकर केंद्रे, माणिक सूर्यवंशी,  तानाजी सुर्यवंशी, बाळकृष्ण माने आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे आरजखेडा, दर्जी बोरगाव, गव्हाण गावात आगमन होताच ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केले.  महिलांनी औक्षण केले. धिरज देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा शब्द यावेळी महिला भगिनींनी दिला तर ग्रामस्थांनी अधिक मताधिक्य देणार असल्याचे सांगून धिरज देशमुख मोठया मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR