लातूर : प्रतिनिधी
शहरातील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवडयाच्या तूलनेत भाजीपाल्याची आवाक ५० टक्यांनी वाढली आहे. बाजार समितीत भजीपाल्याला अधिक मागणी असून दरातही काहीशी सुधारणा झाली असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नूकसान झाले हाते. त्यामुळे काही महिन्यापासून शहरातील बाजार समितीत आवक घटली होती. या आठवड्यात वेळा अमावस्या व मकरसंक्रात हे दोन सण आल्याने मागील चार पाच दिवसापासून बाजार समितीत आवक चागल्या प्रमाणात होत असल्याचे व्यापारी वर्गाने सागीतले. येथील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत दर दिवसाला बाजार भाव निगत असतो त्याचप्रमाणे भाजीपाल्याचे दर ठरवले जातात. शनिवारी महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजापाल्याची आवक चागली झाली आहे. त्यामूळे शेतक-यांना त्यांच्या मालाला चागल्या भाव मिळाला आहे.
शहरातील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक प्रति दहा किलोत वागें ५९ किंव्टलपर्यंत आवक होऊन सर्वसाधारण भाव २४० रुपये प्रति दहा किलो दर मिळाला. दोडका ३४ किंव्टलपर्यंत आवक होऊन भाव २४० रुपये, भेंडि २९ किंव्टलपर्यंत आवक होऊन ३०० रुपये भाव, पत्ताकोबी ४७ किंव्टलपर्यंत आवक होऊन ८० रुपये, फुलगोबी ६ किंव्टलपर्यंत आवक होऊन ५०० रुपये, गावरान टमाटे १७० किंव्टलपर्यंत आवक होऊन ८० रुपये, वैशाली टमाटे १४६ किंव्टलपर्यंत आवक होऊन ८० रुपये, गवार शेंगा १७ किंव्टलपर्यंत आवक होऊन ३४० रुपये, पालक १ किंव्टलपर्यंत आवक होऊन १२० रुपये, गाजर ६० किंव्टलपर्यंत आवक होऊन ८० रुपये, जांब १० किंव्टलपर्यंत आवक होऊन १५० रुपये, भोपळा ३० किंव्टलपर्यंत १२० रूपये, कोंथीबीर २० किंव्टलपर्यंत आवक होऊन ३०० रुपये,
हिरव्या मिरचीची ५६ किंव्टलपर्यंत आवक होऊन ४५० रुपये, वैशाली मिरची ३६ किंव्टलपर्यंत आवक होऊन ३०० रुपये, वरणा ३९ किंव्टलपर्यंत आवक होऊन २४० रुपये, वटाना १०६ किंव्टलपर्यंत आवक होऊन ३२० रुपये, शेवगा ११ किंव्टलपर्यंत आवक होऊन ५०० रुपये, मेथी ७२ किंव्टलपर्यंत आवक होऊन ८०० रुपये, कांदा पात ४ किंव्टलपर्यंत आवक होऊन ७०० रुपये, लिंबू ९२ किंव्टलपर्यंत आवक होऊन १५० रुपये, काकडी ५४ किंव्टलपर्यंत आवक होऊन १२० रुपये, कारले ५ किंव्टलपर्यंत आवक होउन ३५० रूपये, बिट ९ किंव्टलपर्यंत आवक होऊन १५० रुपयापर्यंत प्रति दहा किलाकला दर मिळाला आहे. तर मेथी, कोथ्ािंबीर, शेपू, मुळा, चवळी, गाजर, कांदा पात,जांब, काकडी याला चांगली मागणी राहिली.