29.1 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रमटारची आवक वाढली

मटारची आवक वाढली

पुणे : प्रतिनिधी
पुणे : परराज्यातून होणारी मटारची आवक वाढली आहे. त्यामुळे मटार स्वस्त झाला असून, किरकोळ बाजारात एक किलो मटारचे दर ३० ते ४० रुपयांपर्यंत इतके आहेत. ‘मध्य प्रदेशात मटारची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. भोगी, संक्रांतीनंतर मटारच्या मागणीत घट झाली. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात सध्या दररोज साधारणपणे १२ ते १४ ट्रक मटारची आवक होत आहे. दर रविवारी मटारची आवक दुप्पट होते.

परराज्यातून होणारी मटारची आवक वाढल्याने दरात मोठी घट झाली आहे. सध्या घाऊक बाजारात एक किलो मटारची विक्री २० ते २५ रुपये दराने केली जात आहे. किरकोळ बाजारात एक किलो मटारचे दर प्रतवारीनुसार ३० ते ४० रुपयांपर्यंत आहेत. मटार स्वस्त झाल्याने गृहिणींकडून मागणी वाढली आहे.

पुरंदर, वाईतील मटार लागवडीत घट
‘पुरंदर, वाई भागातील मटार परराज्यातील मटारच्या तुलनेत गोड असतो. गेल्या काही वर्षांपासून पुरंदर, वाई भागातील मटार लागवडीत घट झाली आहे. पुरंदरमधील मटारला ग्राहकांकडून चांगली मागणी असते. पुरंदर, वाई भागतील मटारचा हंगाम अद्याप सुरू झालेला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR