लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील नागरिकांच्या विविध मागण्या सोडविण्याबाबात वेळोवेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे लातूर शहर महानगरपालिका प्रशासनास विनंती करण्यात आली. परंतु महानगरपालीका प्रशासनाच्या वतीने कोणतीच ठोस कार्यवाही व उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे महानगरपालीका प्रशासन सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत झोपेचे सोंग घेत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लातूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने घंटानाद आंदोलना करुन झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सहकारमहर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याची माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने दि. ४ मार्च रोजी सकाळी १० वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, मेन रोड लातूर येथे सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत झोपेचे सोंग घेणा-या महानगरपालिका प्रशासना विरुद्ध घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, लातूर शहर कॉग्रेसचे निरीक्षक जितेंद्र देहाडे, लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, फरीद देशमुख, माजी महापौर प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, अभय साळुंके, अशोक गोविंदपूरकर, विद्याताई पाटील, रविशंकर जाधव, गोरोबा लोखंडे, लक्ष्मण कांबळे, कैलास कांबळे, सचिन बंडापल्ले, इम्रान सय्यद, विजयकुमार साबदे, सपनाताई किसवे, गणेश एसआर देशमुख, प्रवीण सूर्यवंशी, व्यंकटेश पुरी, दगडूअप्पा मिटकरी, आतिष चिकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी लातूर शहरातील विविध समस्याबाबत मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन घंटानाद आंदोलन करण्यात आले. या निवेदनात लातूर शहरात विविध ठिकाणी भूमिगत गटारीचे काम सुरु आहेत. संबंधित कंत्राटदार रोड फोडत आहे, परंतु काम संपल्यानंतर त्या रोडची पक्की दुरुस्ती होत नाही, त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तरी असे नादुरुस्त रस्ते पावसाळयापूर्वी दुरुस्त करण्यात यावेत. महानगरपालिका गाळे भाडे हे दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ च्या शासन परिपत्रकानुसार आकारून वर्षानुवर्ष व्यवसाय करणा-या महानगरपालिका गाळे धारकांना न्याय द्यावा, कोरोनाच्या संकट काळात सेवा देऊन शहर स्वच्छ ठेवणा-या, पारितोषिक मिळवून देणा-या स्वच्छता कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्यात यावे. अस्तित्वात असलेल्या रस्त्यांना जोडल्याशिवाय नवीन रेखांकन मंजूर करु नये. शहरातील ब-याच भागातील नागरिकांना कबाले देण्यात आलेले नाहीत तरी तत्काळ कबाले देण्याची प्रकिया सुरु करण्यात यावी. यामागण्यां तात्काळ मंजूर करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा असे या दिलेल्या निवेदनात मागण्या केल्या आहेत.
या घंटानाद आदोलनाज अॅड. देविदास बोरुळे पाटील, प्रा. प्रवीण कांबळे, अहेमदखा पठाण, सय्यद मोईनउल्ला, युनूस मोमीन, नामदेव इगे, आसिफ बागवान, दत्ता सोमवंशी, अमित जाधव, आयुब मणियार, संजय जगताप, राजकुमार जाधव, सुपर्णा जगताप, प्रवीण घोटाळे, गौस गोलंदाज, भाऊसाहेब भडीकर, सुंदर पाटील कव्हेकर, कुणाल वागज, सिकंदर पटेल, राजेश गुंठे, धोंडीराम यादव, नागसेन कामेगांवकर, कल्पनाताई मोरे, शीतल मोरे, शिंदेताई, कमलताई मिटकरी, सुलेखाताई कारेपूरकर, अभिजित इगे, अकबर माडजे, अभिषेक पतंगे, विष्णुदास धायगुडे, प्रमोद जोशी, करण गायकवाड, अक्षय मुरुळे, अनुप मलवाड, सुधीर आणवले, विकास वाघमारे, रोहित वडरुले, अॅड. गोपाळ बुरबुरे, रत्नदीप अजनिकर, अॅड. अंगदराव गायकवाड, यशपाल कांबळे, विजय टाकेकर, राज क्षीरसागर, अॅड. विजय गायकवाड, फारुख शेख, पवनकुमार गायकवाड, सत्यवान कांबळे, बब्रुवान गायकवाड, नबी नळेगावकर, सुरेश गायकवाड, सायरा पठाण, वाघमारेताई, तनुजा कांबळे, कमल शहापूरे, यशपाल कांबळे, पिराजी साठे, आकाश मगर, अमोल गायकवाड, धनराज गायकवाड, मुनवर सय्यद, आबू मणियार, अजीज बागवान, हमीद बागवान, तबरेज तांबोळी, संदीपान सूर्यवंशी, युनूस शेख, राहुल डूमणे, अॅड. गणेश कांबळे, सुरज पांचाळ, नितीन कांबळे, सोमेन वाघमारे, राजू गवळी, नितीन कांबळे आदी उपस्थित होते.