15.9 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगे घेणार दसरा मेळावा?

मनोज जरांगे घेणार दसरा मेळावा?

छ. संभाजीनगर : राज्यात दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा, आरएसएसचा दसरा मेळावा, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत असतो. आता या दसरा मेळाव्यात आणखी एका दसरा मेळाव्याची भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे दसरा मेळावा घेणार असल्याचे बोलले जात आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी तीव्र लढा उभारला आहे. यानंतर आता मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार असल्याची माहिती येत आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी आज बीडच्या नारायणगड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत मेळाव्याची रूपरेषा ठरणार आहे. या बैठकीला बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील समन्वयक व मराठा समाजबांधवांची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीतच मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा व ठिकाण देखील ठरणार असल्याची माहिती मिळत आहे.

जरांगेंच्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार?
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार पंकजा मुंडे समर्थकांना दसरा मेळाव्यातून संबोधित करतात. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करतात. शिवसेना फुटीनंतर तर एकनाथ शिंदे यांनीही दसरा मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन करण्याची संधी सोडली नाही. त्यात आता मनोज जरांगे पाटलांचा दुसरा दसरा मेळावा नारायणगड येथे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख दसरा मेळावे
१. शिवसेना (उबाठा) शिवाजी पार्क.
२.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रेशीमबाग, नागपूर.
३. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आझाद मैदान, मुंबई.
४. पंकजा मुंडे, सावरगाव घाट.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR