24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरमनोज जरांगे पाटील यांची निलंग्यात आज सभा

मनोज जरांगे पाटील यांची निलंग्यात आज सभा

निलंगा : प्रतिनिधी
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे म्हणून मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांची आज दि ९ डिसेंबर रोजी निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता सभा होणार आहे. या सभेसाठी निलंगा सकल मराठा समाजाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे .

निलंगा नगरीत जरांगे पाटील यांचे आगमन होताच उदगीरमोड येथे दलित बांधवांच्या वतीने, जिजाऊ चौकात ंिलगायत बांधवांच्या वतीने तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुस्लिम समाज डॉक्टर व वकील मंडळी यांच्या वतीने त्यांचा सत्कार होणार आहे. छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणहून २१ बैलगाड्यांच्या रॅली काढण्यात येणार आहे. ज्यांचे सारथ्य महिलांच्या हाती असेल. एका बैलगाडीत जरांगे पाटील असतील. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सभेच्या ठिकाणी बैलगाडीतून पुष्पवृष्टी करीत जरांगे पाटील यांचे आगमन होईल. विचारपीठावर पाच मुलींच्या हस्ते त्यांचे स्वागत होईल. त्यानंतर सर्व जातीधर्मातील प्रतिनिधीच्या वतीने पांिठबा पत्र देण्यात येईल. स्टेजच्या डाव्या बाजूला महिला व विद्यार्थ्याची बसण्याची व्यवस्था उजव्या बाजूला पुरुषांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सभेच्या ठिकाणी आठ स्क्रीन लावण्यात येणार आहेत. सभेच्या ठिकाणी प्रत्येक नागरिकांना पाणी आणि अल्पोपाहार देण्यात येणार आहे.

सभेच्या सर्व बाजूंनी मोबाईल व्हॅन दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर औराद शहाजानी, निटूर, अंबुलगा येथून येणा-या वाहनासाठी जिजाऊ चौकातून दापका वेसीकडे जाणा-या रस्त्यावरील आदर्श विद्यालय व जनावरांचा बाजार भरणा-या मैदानात पार्किंग व्यवस्था, कासारसिरसी व मदनसुरी कडून येणा-या वाहनांना जुने मार्केट यार्ड मैदानावर पार्किंग, पानंिचंचोली, मसलगा, हाडगा येथून येणा-या वाहनांना बाजार समितीच्या मैदानात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी खास पाच वाजेपर्यंत येणा-या वाहनांना महाराष्ट्र इंजिनिअर कॉलेजच्या पाठिमागील मैदानात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना सभेच्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून येता येणार आहे. त्यांना कोणीही विरोध करणार नाही असे आयोजकांनी सांगितले. सायंकाळी ५ वाजेपासून शाहीर राजेंद्र कांबळे खूडूसकर यांच्या शाहीरीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. जरांगे पाटील यांच्या सभेला सर्व जातीधर्मातील नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR