जळकोट : प्रतिनिधी
समाज बांधवांचे शिवश्री मनोज जरागे पाटील हे महाराष्ट्रातील अती महत्वाचे व्यक्तीमत्व असून अतरवली सराटी येथे ज्या घरी राहतात तेथील व आंदोलन स्थळाची घातपाताच्या उद्देशाने ड्रोनद्वारे पाहणी करण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी जळकोट सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार जळकोट मार्फत राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.
हा प्रकार अतिशय गंभीर असून त्यांच्या रोजच्या हालचालीवर लक्ष ठेवून वेळ साधण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून लाखो समाज बांधव फोन करून व सोशल मीडिया तूनचिंंता व रोष व्यक्त करीत आहेत. या मागणीचा विचार तात्काळ व्हावा व या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने समजून घ्यावे तसेच त्या पाळत ठेवणा-या व्यक्तीचा शोध घेऊन शिवश्री मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी मारोती रामदास जाधव, अनिल वसंत ढोबळे, संतोष देविदास पवार, बिरादार पाटोदकर, शिवशंकर माधवराव लांडगे, मुक्तेश्वर गोंिवंदराव पाटील, संजय बालाजी माने यांच्यासह सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार जळकोट यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.