21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रमविआपाठोपाठ मनसेलाही ईव्हीएमवर संशय

मविआपाठोपाठ मनसेलाही ईव्हीएमवर संशय

ईव्हीएमशिवाय हा निकाल अशक्य

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीपाठोपाठ आता मनसेनेदेखील ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. ईव्हीएमने घात केला असल्याचे म्हणत मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणुकीच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २३० जागा जिंकत महायुती सत्तेत आली आहे. तर केवळ ४९ जागांवर महाविकास आघाडीला समाधान मानावे लागले आहे. मनसेला तर एकही जागा जिंकता आलेली नाही. असे असताना ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडीने संशय व्यक्त केलेला असतानाच मनसेने देखील ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे.

मागच्या काही दिवसांपासून जे व्हीडीओ समोर येत आहेत ते पाहता लक्षात येईल निकाल कसा मॅनेज केला आहे. हा निकाल आम्हाला मान्य नाही. दहा वर्षे जे आमदार भेटत नव्हते ते आमदार एकेक लाखाच्या मताने निवडून आलेत. ईव्हीएमशिवाय हा निकाल अशक्य आहे. ईव्हीएमने घात केला आहे. ईव्हीएममुळे अनेक पक्षांना उतरती कळा लागली आहे, असे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी म्हटले.

पुढे बोलताना जाधव म्हणाले, एवढा मोठा विजय मिळवून देखील भारतीय जनता पक्षात आनंद व्यक्त होत नाही. ईव्हीएमविरोधात विरोधी पक्ष किती एकत्र आला तरी होणार काही नाही. देशात काहीतरी चुकीचे चालले आहे हे आता कळले पाहिजे.

अमेरिकेसारख्या देशात जर बॅलेटवर मतदान होत असेल तर मग इथे कशाला ईव्हीएम पाहिजेत. या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेची आणि मनसेची सुद्धा फसवणूक झाली आहे. न्यायालय त्यांचे, निवडणूक आयोग त्यांची, मग आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? यापुढच्या निवडणुका आम्ही लढवायच्या की नाही असा प्रश्न आता मला पडला आहे. हा निकाल सेट होता सगळेच यांचे निवडून आले असते तर लोकांनी यांना चपलेने मारले असते, असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे मांडणार भूमिका
ईव्हीएमबाबत राज ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडतील. उमेदवारांना लोक शिव्या घालत होते. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची लाट होते ही दिसत नव्हती या उलट भारतीय जनता पक्षाबद्दलचा राग दिसला. निवडणुकीत एक पिक्चर तयार केले. त्यात लाडकी बहीण बसवली, ‘बटेंगे तो कटेंगे’ हे बसवले गेले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR