26.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeलातूरमहसूल  आयुक्तालयासाठी लातूरकर पुन्हा रस्त्यावर

महसूल  आयुक्तालयासाठी लातूरकर पुन्हा रस्त्यावर

लातूर : प्रतिनिधी
गुणवत्ता व सर्वसामान्यांच्या सोयीच्या दृष्टीकोनातून मराठवड्यातील दुसरे विभागीय महसूल कार्यालय लातूर येथेच स्थापन व्हावे, या मागणीसाठी दि. २१ फेबु्रवारी रोजी दुपारी वकील मंडळाच्या वतीने जिल्हा न्यायालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
मराठवाड्यात स्वतंत्र महसूल आयुक्त कार्यालय स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने यापुर्वीच घेतलेला आहे. काही वर्षांपुर्वी नांदेड येथे आयुक्त कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय तत्कालिन महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीमंडळाने घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात लातूरकरांनी तीव्र संघर्ष केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडातील आयुक्तालयाबाबत शासन आदेश (शुद्धीपत्रक) दि. १६ फेबु्रवारी २०१५ रोजी नूसार विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबादचे विभाजन करुन नव्याने निर्माण करावयाच्या विभागीय आयुक्तालायात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश असावा व त्याचे मुख्यालय कोठे असावे, या सर्व बाबींचा अभ्यास करुन शासनास शिफारस करण्यासाठी एक सदस्यिय अभ्यासगट गठीत केलेला होता. एक सदस्यिय अभ्यासगटाचे प्रमुख उमाकांत दांगट यांनी महाराष्ट्र शासनास मराठवाड्यातील दुसरे विभागीय महसूल कार्यालय स्थापनेबाबत अहवाल दिलेला
आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दि. १९ फेब्रुवारी २०११ रोजी लातूर येथे विभागीय कार्यालयासाठी प्रशासकीय इमारतीस मान्यता दिली आणि दहा वर्षांपुर्वीच या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही अद्ययावत वास्तू लातूर- बार्शी रोडवर आहे. गुणवत्तेच्या आधारावर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सोईच्या दृष्टीकोणातून लातूर येथेच विभागीय महसूल आयुक्त कार्यालय स्थापन करणे योग्य आहे. परंतु, काही दिवसांपुर्वी महसुल मंत्री यांनी नांदेड येथील कार्यक्रमात नांदेडबाबत अनुकूल वक्तव्य केल्यामुळे लातूर, बीड, धाराशीव येथील नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने एक सदस्यिय अभ्यासगट समितीने लातूर येथे आयुक्तालय स्थापनेसाठी सकारात्मक शिफारस केली असल्यामुळे आणि मराठवड्याच्या सर्वांगीन विकासासाठी लातूर येथेच मराठवड्यातील दुसरे स्वतंत्र विभागीय महसुल कार्यालय स्थापन करावे,्र असे वकील मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात नमुद केले आहे.
या आंदोलनात अ‍ॅड. उदय गवारे, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, अ‍ॅड. अण्णाराव पाटील, अ‍ॅड. किरण जाधव, अ‍ॅड. शरद इंगळे, अ‍ॅड. चंद्रकांत आगरकर, अ‍ॅडग़ंगाधर कोदळे, अ‍ॅड. किशन शिंदे, अ‍ॅड. अजय कलशेट्टी, अ‍ॅड. प्रदीप पाटील, अ‍ॅड. विजय जाधव, अ‍ॅड. वसंत ओगले, अ‍ॅड. व्यंकट नाईकवाडे, अ‍ॅड. श्रीमती भूरे, अ‍ॅड. तृप्ती इटकरी, अ‍ॅड. अभिलाषा गवारे, अ‍ॅड. आर. बी. काळे, अ‍ॅड. बी. जी. कदम, अ‍ॅड. बालाजी कुटवाडे, अ‍ॅड. भालचंद्र कवठेकर, अ‍ॅड. चव्हाण, अ‍ॅड. एन. बी ठाकुर, कॉे. विश्वंभर भोसले आदी सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR