28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरमहायुती सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला 

महायुती सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला 

देवणी  : प्रतिनिधी
राज्यातील विद्यमान महायुती सरकारने सत्तेवर आल्यानंतर केवळ पोकळ आश्वासने देऊन सर्वच समाजाला झुलत ठेवण्याचं काम केले असून केवळ आमिष दाखवण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळें यांना आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पराभूत करा, काँग्रेसच्या उमेदवारांना भरभरुन आशीर्वाद द्या, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.
देवणी तालुक्यातील तळेगाव येथे बुधवारी जयभवानी नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने देवींची महापूजा माजी मंत्री दिलीपराव देशमुख  यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे तळेगाव येथे आगमन होताच ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केले. ग्रामदैवत असलेले भोगेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेतले त्यानंतर गावातून ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या  गजरात स्वागत केल.
भोगेश्वरांच्या आशिर्वादाने लक्ष्मण मोरे यांच्या मदतीने येथे जागृति शुगर कारखाना सुरु केले. कारखान्याने १२ वर्षात मागे वळून पाहिले नाही. उस कधी कमी पडला नाही. गावातील लोकांनी सहकार्य केले असून या भागातील शेतक-यांचे जीवन सुखी झालेले आज बघत आहोत. हा खरा विकास आहे. यामुळें या भागाचा कायापालट झाला आहे, असे सांगून सत्ताधारी पक्षाचे लोक नुसत्या घोषणा देवुन लोकांना आमिष दाखवत आह.े हे आपण वेळीच ओळखल पाहिजे. विकास काय असतो हे समोर दिसला पाहिजे. जागृती शुगरने गेल्या १२ वर्षात या भागातील ऊस उत्पादक शेतक-यांना एफ. आर. पी. पेक्षा अधिक ७८ कोटी रुपये स्वत: च्या नफ्यातून देण्याचे काम केले. ही आमची बांधिलकी म्हणून आम्ही दीले आहेत. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे नेते नुसत्या घोषणा देत कुठलीच विकास कामे केली नाहीत. शेतक-यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी काहीच कार्यक्रम नाही. उलट भाव खाली पडले सर्वांचा विश्वासघात करण्याचे काम महायुती सरकारने केला आहे. त्यामुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत करा उमेदवार कोणीही येवू त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन त्यांनी केले
यावेळी जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर काँसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डा.ॅ अरविंद भातंब्रे, जिल्हा बँकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर, उदगीर बाजार समितीचे सभापति शिवाजी हुडे, कुशावर्रति बेळ्ळे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शिलाताई पाटील, गोविंदराव भोपनीकर, अजित माने, देवणी तालुका काँग्रेस अध्यक्ष अजित बेळकोने,  काँगेस मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, सौ झिल्ले, अँड आदिती निटूरे, संभाजी रेड्डी, मालबा घोणसे भगवान गायकवाड, मानकरी आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विजय देशमुख, कोटे, अंगद घोणसे, शिवाजी कांबळे, राम बिरादार, संदीप कोनाळे, गोविन्द इंगोले, भगवान रेनुके यांच्यासह ग्रामस्थ महिला पुरुष मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR