24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरमहाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाचे  ३४ वे राज्यस्तरीय अधिवेशन

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाचे  ३४ वे राज्यस्तरीय अधिवेशन

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉमचे ३४ वे राज्यस्तरीय अधिवेशन दि. ११ व १२ जानेवारीदरम्यान लातूरनगरीत दिवाणजी कार्यालयात होणार आहे.  या संदर्भात लातूर येथे नुकतीच आढावा बैठकीचे आयोजन करण्यात  आले होते. फेस्कॉमचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, उपाध्यक्ष अशोक तेरकर, मुख्य सचिव चंद्रकांत महामुनी, माजी अध्यक्ष अरुण रोडे, डॉ. दामोदर थोरात, डॉ. मायाताई कुलकर्णी, डॉ. बी. आर. पाटील संघटक सचिव, प्रभाकर कापसे, महिला संघाच्या अध्यक्षा व सचिव व ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेण्यात आली. लातूर येथील अधिवेशनास महाराष्ट्रातून २ हजार ५०० ते ३ हजार ज्येष्ठ  नागरिक येतील, अशी आशा आहे. अधिवेशनात मान्यवरांची भाषणे, उद्घाटन सत्र, परिसंवाद, पुस्कार वितरण, र्स्म्णिका प्रकाशन व समारोप कार्यक्रमात काही ठराव संमत होणार आहेत.
अधिवेशन यशस्वी करण्याकरिता सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आण्णासाहेब टेकाळे , चंद्रकांत महामुनी, डॉ. बी. आर. पाटील, प्रभाकर कापसे, डॉ. दामोदर थोरात, जगदीश जाजू, डॉ.  निर्मला कोरे, आर. बी. जोशी, प्रकाश नीला, रमेश भोयरेकर, शहाजी घाडगे, डॉ. भास्कर बोरगावकर, अधिवेशनाचे कार्यवाह प्रकाश घादगिने  आदिनी केले  केले आहे. अधिक माहितीसाठी प्रकाश घादगिने ९४२१६९५४५४  या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR