शिरूर ताजबंद : प्रतिनिधी
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांचा नेतृत्वाखाली शेतक-यांचा मोर्चा काढण्यात आला. तालुक्यात पावसाळ्यातही वेळेवर पाऊस पडला त्यामुळे काही शेतक-यांंकडे थोडेसे पाणी असतानाही फक्त रात्रीची लाईट देतात. शेतक-यांना दिवसभर सिंंगल फेज सुरू करावे या मागणीसाठी महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे.
शिरुर ताजबंद येथे शिंगल फेज सुरू करा अन्यथा आम्ही अहमदपूर शहरात मध्ये मोर्चा काढण्यात येईल तसेच शिरुर ताजबंद व सर्व परिसरातील शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. माजी आमदार विनायकराव पाटील म्हणाले, की शेतक-यांंवर होणारे अन्याय व अत्याचार थांबले पाहिजेत. शेतक-यांंचा ऊसही वेळेवर गेला नाही. त्यात महावितरणचा असा बेजबाबदारपणा सुरू आहे.
याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे असे ते म्हणाले. या मोर्चास अहमदपूर पंचायत समितीचे माजी सभापती आर. डी. शेळके, सामाजिक कार्यकर्ते भोसले शिवानंद, माजी पंचायत समिती सदस्य भातीकरे रमाकांत, माजी पंचायत समिती सदस्य राजू खंदाडे, माजी तंटामुक्त अध्यक्ष बबन बिलापट्टे, बालाजी जवळगे, माजी व्हॉइस चेअरमन सत्यवान भोसले, अमोल भोसले, सिद्धेश्वर औरादे, ग्रा.प. सदस्य रणधीर पाटील, ग्रा.प. सदस्य गजेंद्र वलसे, शिवराज पाटील, ज्ञानोबा सारोळे, किनीवाले इस्माईल, नाना शेख, किशन कापसे, हरी बिलापट्टे, संतोष सारोळे, रविराज पाटील, श्याम सोनटक्के, जयवंत सगर, गोपाळ महाके, अविनाश राजे, गणेश देशपांडे, आम्रत सारोळे, नंदकुमार महाके, हणमंत बडगिरे, नामदेव चामे, शाम सोनटक्के , नामदेव गुडंरे, धोंडीराम राजे, अवधूत खेडकर, किरन दावणगावे, रोपळेकर अमोल यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.