साडेचार लाख लाडू विक्री
५२ गॅ्रम सोने, ६ किलो चांदीही प्राप्त
पंढरपूर /प्रतिनिधी
माघ यात्रा कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान केले तसेच सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले. मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, पूजा, फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून मंदिर समितीस ३ कोटी ३ लाखांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
माघ यात्रेसाठी राज्याच्या कानाकोप-यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. माघ शुध्द १ (दिनांक ३० जानेवारी) ते माघ शुध्द १५ (दिनांक १२ फेब्रुवारी) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ ३२३३४२० रुपये अर्पण, ८०३४१२८ रुपये देणगी, ४०८१००० रुपये लाडू प्रसाद विक्री, ३६८३९६९ रुपये भक्तनिवास, ८८८८०० पूजेच्या माध्यमातून, ८६४८१५२ रुपये हुंडी पेटी, १०३९७०७ रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमूत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यमातून ६९७६४० रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.
मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ ३२४७७७४ रुपये अर्पण, ८९०२७९८ रुपये देणगी, लाडू प्रसाद विक्रीतून ३९४४०००, भक्तनिवास ५०९०७२१ रुपये, ७२८६०० रुपये पूजेच्या माध्यमातून, ११५९८७३९ रुपये हुंडी पेटीतून, ५१५८०५ रुपयाचे सोने-चांदीचे दागिने अर्पण, तसेच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमूत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यमातून ९९४०८२ रुपये प्राप्त झाले होते. यामध्ये प्रामुख्याने सुमारे ४ लाख ५० हजार लाडू प्रसादाची विक्री झाली असून सुमारे ५२ ग्रॅम सोने व ६ किलो चांदीच्या वस्तू प्राप्त झालेल्या आहेत.
गतवर्षीपेक्षा यंदा
४७ लाखांची घट
सन २०२४ च्या माघी यात्रेत रु. ३५०२२५१९/- व या वर्षीच्या यात्रेत रु. ३०३०६८१६/ इतके उत्पन्न प्राप्त झाले असून मागील यात्रेच्या तुलनेत रु. ४७१५७०३ इतकी घट झाल्याचे दिसून येत आहे.