लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शनिवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिका-यासह नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या निवेदनाचा व निमंत्रणाचा स्वीकार करुन संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या.
याप्रसंगी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी सभापती रणजीत पाटील, दिलीपसिंह देशमुख, दादासाहेब खरसुडे, चंद्रकांत वाळके, विनोद वीर, एकनाथ पाटील, विजयकुमार साबदे, सुंदर पाटील कव्हेकर, अॅड. अतिष चिकटे, अनिल पाटील, विशाल पाटील, संभाजी रेड्डी, पांडुरंग वीर पाटील, अंकुश शेळके, जफर पटेल, भारत झाडके, गुरुनाथ मधुरकर, शिवाजी बोयणे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.