लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अंबाजोगाई रोडवरील उमरखॉॅ कायमखानी यांच्या पुढाकारातून उभारलेल्या सर्व सोयींनीयुक्त अत्याधुनिक कोको सुपर मार्टचे उद्घाटन करण्यात आले.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी कोको सुपर मार्टची पाहणी करून अत्याधुनिक कोको सुपर मार्ट उभारल्याबद्दल कायमखानी कुटुंबीयांचे कौतुक करून त्यांना पुढील व्यवसाय वाढीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, डॉ. अशोक पोद्दार, परदेशी, असलम खानसाहब कायमखानी, जकी खानसाहब कायमखानी, डॉ. साकेब खानसाहब कायमखानी, उमरखा कायमखानी, फैजल कायमखानी, खलीद कायमखानी, मुबशीर कायमखानी, मुक्तदीर कायमखानी, गणेश एसआर देशमुख, आयुब मणियार, पप्पू देशमुख, दत्ता सोमवंशी आदीसह कायमखानी कुटुंबीय मित्रपरिवार काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.