20 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeलातूरमानधनासाठी शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार 

मानधनासाठी शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार 

उदगीर : प्रतिनिधी
मतदान अधिकारी व कर्मचा-याच्या प्रशिक्षणात मराठा आरक्षणासंदर्भात  जाहीर करण्यात आलेले  मानधन देण्यात यावे तसेच दिव्यांग कर्मचा-यांना निवडणुकीच्या कामातून सूट मिळावी या मागणीसाठी सर्व शिक्षक कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत.  गेली सहा महिने झाले यासंदर्भात शिक्षकांच्या विविध संघटनांनी आपले निवेदन देऊन मराठा आरक्षणासंबधीचे मानधन ताबडतोब देण्याची विनंती केली आणि तसे निवेदन माजी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनाही देण्यात आले.
त्यावेळी त्यांनी तीन वेळा सर्व संघटनांच्या पदाधिका-यांंच्या समोर फोन लावून संबंधितांना मानधन वाटपाविषयी सांगितले परंतु अद्याप पर्यंत शिक्षकांना ते मिळालेले नाही त्यामुळे उद्याच्या रविवारी होत असलेल्या मतदार अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणात  काळ्या फिती  लावून काम करण्याचे निवेदन तहसीलदार उदगीर यांना देण्यात आले आहे. जिल्ह्यातील बाकीच्या सर्व तालुक्यात हे मानधन वाटप करण्यात आले आहे परंतु उदगीर मध्ये हे मानधन वाटप करण्यात आले नाही त्यामुळे सर्व कर्मचारी आपला निषेध नोंदवण्यासाठी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. असे निवेदन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने देण्यात आले असून यावर शाम राठोड, ज्ञानेश्वर बडगे, राजशेखर राम शेट्टी, विनायक धुमाळे, विवेक होळसंबरे, कपाळे आर जी, गड्डमवार डि.एम. यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR