27.3 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeलातूरमारहाण प्रकरणी ४ आरोपींना कारावास

मारहाण प्रकरणी ४ आरोपींना कारावास

लातूर : प्रतिनिधी
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी चार आरोपींना प्रथमवर्ग न्यायाधिश, औसा पी. पी. आवटे यांनी एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीने मारहाण केल्याने जखमी फिर्यादीच्या उपचारासाठी दोन हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडितेस देण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले.

सन २०२१ मध्ये शेतातील बाभळीच्या झाडावरून झालेल्या वादामुळे नमूद आरोपींनी पीडित महिलेला मारहाण केल्याची घटना घडली होती. सदर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे औसा येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २८/२०२१ कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवी प्रमाणे आरोपी नामे विजयकुमार यादवराव इंजे, दिलीप यादवराव इंजे, मुकिंद दिलीप इंजे, ज्ञानेश्वर विजयकुमार इंजे सर्व राहणार याकतपूर तालुका औसा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी पोलीस अंमलदार गिरी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा तपास करुन तपासात साक्षीदार तपासून नमूद आरोपी विरुद्ध सबळ दोषारोप न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

शेतातील बाभळीच्या झाडा वरून झालेल्या वादामुळे नमूद आरोपींनी पीडिताला धमकावत मारहाण व शिवीगाळ केली होती. या खटल्यात सरकार पक्षाने साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्रीमती ए. एन. निळेकर व एम. एच. रेचवाडे, कोर्ट पैरवी म्हणून पोलीस अंमलदार मर्ढे यांनी काम पाहिले तर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा कुमार चौधरी औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गिरी यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला. पीडिता व साक्षीदारांची साक्ष तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्रा धरीत न्या. पी.पी. आवटे यांनी आरोपीला उपरोक्त शिक्षा ठोठावली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR