23.7 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeलातूरमालमत्ता करदात्यांसाठी प्रोत्­सानपर बक्षीस योजनेस मुदतवाढ

मालमत्ता करदात्यांसाठी प्रोत्­सानपर बक्षीस योजनेस मुदतवाढ

लातूर : प्रतिनिधी
कर संकलन व कर आकारणी विभाग लातूर शहर महानगरपालिका यांच्या वतीने वर्षाच्या सुरुवातीपासूनच मालमत्ताधारकासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार वेळोवेळी विविध प्रकारचे सुटची  योजना  लागू करण्यात  आल्­या होती. तसेच मालमत्ता करदात्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजनेस २१ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
लातूरकराना एक अनोखी भेट म्­हणून दिं. २० जानेवार ते दि. १० फेब्रुवारीपर्यंत थकबाकीसह चालू अर्थिक वर्षातील संपूर्ण कराचा एक रक्­कमी भरणा करणा-या करदात्­यास लातूर शहर महानगरपालिकेमार्फत प्रोत्­सानपर बक्षीस योजना राबवण्­यात येत असून सदरील योजनेस दि. २१ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. विजेत्यांची नावे ऑनलाइन पद्धतीने निवडण्यात येणार आहेत. योजनेच्या कालावधीतील टॅक्स भरणा  पावती ही सहभाग असल्याचे नोंद होईल. तरी वरील मुदतीत कर भरणा करणा-या कर दात्­यास मालमत्­ता कर श्रेणीनुसार खालील प्रमाणे प्रोत्­सानपर बक्षीस देण्­यात येणार आहे.
कर गुप्र  रु. १ ते ५००० करिता बक्षीस वस्­तू १५ (मिक्­सर), कर गुप्र  रु. ५००१ ते १०००० करिता बक्षीस वस्­तू १० (कुलर) कर गुप्र  रु. १०००१ ते २५००० करिता बक्षीस वस्­तू ५ (फ्रिज) कर गुप्र  रु. २५००१ ते  १००००० करिता बक्षीस वस्­तू २ (कलर टि.व्हि) कर गुप्र  रु. १००००० वरील सर्व, वस्­तू १ (स्कूटी बाईक) कर गुप्र रु, ०१ ते १००००० करिता वस्­तू १ (स्कूटी बाईक) प्रोत्­साहनपर वक्षीस.
या प्रमाणे प्रोत्­सानपर बक्षीस योजनासाठी वस्­तू ठेवण्­यात आल्­या असून या उपर हे जे मालमत्­ताधारक थकीत मालमत्­ताकराचा व पाणी पट्टीकराचा भरणा करणार नाहीत अशा मालमत्­ताधारकांवर महानगरपालिकेच्­या वसूली पथकामार्फत मालमत्­ता सील करणे,आटकाणी करणे तसेच नळ जोडणी खंडीत करणे या स्­वरूपाची कार्यवाही हाती घेण्­यात येत आहे. तसेच जे मालमत्­ताधारक मालमत्­ता सील करूनही मुदतीमध्­ये कराचा भरणा करणार नाहीत अशा मालमत्­ता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसार स्थावर मालमत्ताच्या लिलाव  महानगरपालिकेमार्फत  करून वसूली करण्­यात येणार आहे.  तरी वरील मुदतीत टॅक्स भरणा करावा व बक्षीस जिंकावे तसेच जप्­तीसारखी कठू कार्यवाही टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे  यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR